• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 संस्कृतीचे ‘शव’ आणि प्रशासनाचा ‘उत्सव’?

admin by admin
September 16, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात देवीच्या नावावर नंगानाच, प्रशासनाच्या आशीर्वादाने फोफावले अवैध धंदे!
0
SHARES
100
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

एका माजी उपसरपंचाचा बळी गेल्यानंतर  धाराशिवच्या तथाकथित ‘सांस्कृतिक’ केंद्रांचा जो नागडा नाच चव्हाट्यावर आला आहे, तो केवळ व्यवस्थेच्या अपयशाचा नाही, तर प्रशासनाच्या निर्लज्जपणाचा आणि सामाजिक अधःपतनाचा एक जळजळीत अध्याय आहे. देवी-देवतांची पवित्र नावे धारण करून ‘तुळजाई’ आणि ‘महाकाली’ सारखी कलाकेंद्रे प्रत्यक्षात कलेचे नाही, तर गुन्हेगारी आणि विनाशाचे अड्डे बनले आहेत. या केंद्रांच्या रोषणाईत अनेकांचे संसार जळत असताना, प्रशासन मात्र या आगीवर तेल ओतण्याचे काम करत आहे की काय, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे.

विकासाच्या बाबतीत देशात तळाच्या जिल्ह्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या धाराशिवमध्ये अवैध धंद्यांचे पीक मात्र जोमात आहे. पूर्वी ज्या ‘मनोरंजना’साठी लोकांना दुसऱ्या जिल्ह्यांची वाट धरावी लागत होती, तो सामाजिक कर्करोग आता जिल्ह्याच्या नसानसांत भिनवला जात आहे. आणि हे सर्व होत असताना प्रशासन काय करत होते? जेव्हा वाशीच्या तहसीलदारांनी पोलिसांच्या स्पष्ट अहवालानंतर तुळजाई केंद्राचा परवाना रद्द करण्याची हिंमत दाखवली , तेव्हा वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती देऊन कोणाचे हित जपले?  पोलिसांच्या अहवालाला केराची टोपली दाखवून पुन्हा तपासणीचा खेळ मांडण्यामागे कोणता ‘अर्थपूर्ण’ हेतू होता, याचे उत्तर जिल्हा प्रशासनाला द्यावेच लागेल.

आता पोलिसांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांपुढे जो अंतिम अहवाल सादर केला आहे, तो केवळ एक अहवाल नसून या केंद्रांच्या पापाचा घडा आहे. अवैध दारू विक्री, महिलांची छेडछाड, गंभीर गुन्ह्यांची नोंद आणि थेट आत्महत्येशी जोडलेले धागेदोरे, यानंतरही कारवाईसाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे? एका बाजूला गावातील महिला आपली तरुण पिढी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनातील काही अधिकारी या केंद्रांना वाचवण्यासाठी कायद्याच्या पळवाटा शोधत आहेत, हे चित्र भयावह आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर आज केवळ एक फाईल नाही, तर धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थ्याचा आणि प्रशासकीय नैतिकतेचा फैसला आहे. पोलिसांनी आपला ‘राजधर्म’ निभावला आहे, स्थानिक महिलांनी आपला निर्धार दाखवला आहे. आता प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेचा आहे. ते या संस्कृतीच्या ‘शवा’वर अंतिमसंस्कार करणार, की गुन्हेगारीच्या या ‘उत्सवा’ला मूकसंमती देणार? याचे उत्तर त्यांच्या एका सहीवर अवलंबून आहे आणि संपूर्ण जिल्हा ते पाहण्यासाठी थांबला आहे.

  • सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 
Previous Post

तुळजाई कला केंद्राच्या पापाचा घडा भरला! परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम अहवाल

Next Post

तुळजापूर नवरात्र महोत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पाडा; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post
तुळजापूर नवरात्र महोत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पाडा; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश

तुळजापूर नवरात्र महोत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पाडा; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवच्या कोंड गावात जमादार कुटुंबियांमध्ये रक्ताळलेला राडा! कुऱ्हाड आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला; दोन्ही गटांतील १४ जणांवर गुन्हे दाखल

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group