धाराशिव: फायनान्शिअल इन्क्लुजन लि. कंपनीच्या ६ लाख २ हजार ७८ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी घडली असून, याबाबत पांडुरंग नसिमल्लू गनुवाड यांनी ७ मे २०२५ रोजी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित राजेंद्र गायकवाड (रा. जकेकुरवाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव) आणि ज्ञानेश्वर गोपाल कवडे (रा. उजणी, ता. अंबेजोगाई, जि. बीड) यांनी संगनमत करून ही फसवणूक केली. फिर्यादी पांडुरंग गनुवाड (वय ४१ वर्षे, रा. किणी, ता. भोकर, जि. नांदेड, सध्या रा. वैष्णवी नगर, धाराशिव) हे राजेश घुट्टे यांच्या तळमजल्यावरील घरी वास्तव्यास आहेत. आरोपींनी फिर्यादीच्या ताब्यात विश्वासाने सोपवलेल्या फायनान्शिअल इन्क्लुजन लि. कंपनीच्या ६,०२,०७८ रुपये रोख रकमेचा अप्रामाणिकपणे अपहार केला.
याप्रकरणी पांडुरंग गनुवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.