धाराशिव : तुळजाईनगर येथे मागील वादातून महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सहा जणांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आजीज बाबुलाल शेख (रा. महाळंगी), आझाद जावेद शेख, आर्शद जावेद शेख, शबाना कमाल शेख, मैमुन्ना अल्लानुर शेख (सर्व रा. तुळजाईनगर, धाराशिव) यांनी दि. 16 मार्च 2025 रोजी रात्री 9 वाजता तुळजाईनगर येथील अक्षय मेटल चौकात फिर्यादी आशा पाशुमिया शेख (वय 43 वर्षे, रा. तुळजाईनगर) यांच्यावर हल्ला केला.
मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केले. या घटनेनंतर जखमी आशा शेख यांनी दि. 28 मार्च 2025 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.
आर्थिक वादातून दोन तरुणांकडून एकास मारहाण, गुन्हा दाखल
धाराशिव : पवारवाडी येथे आर्थिक वादातून तरुणास मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार पांढरे आणि अभिजीत पांडुरंग पांढरे (दोघेही राहणार पवारवाडी, तालुका व जिल्हा धाराशिव) यांनी दि. 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी 8:50 वाजता पवारवाडी येथे ऋषीकेश तानाजी मुंडे (वय 23 वर्षे, राहणार पवारवाडी) यांना आर्थिक व्यवहारावरून वाद होऊन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दुचाकीच्या पाईपाने मारहाण केली. या मारहाणीमध्ये ऋषीकेश मुंडे गंभीर जखमी झाले आहेत.
गुन्ह्याची तक्रार जखमी ऋषीकेश मुंडे यांनी दि. 28 मार्च 2025 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, भा.दं.वि. कलम 118(2), 115(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करीत आहेत.