धाराशिव : फिर्यादी नामे- मिथुन सुभाष वाणी, वय 37 वर्षे, व्यवसाय- नोकरी कृषी पर्यवेक्षक कृषी कार्यालय भुम रा. शिवाजी नगर भुम, ता. भुम जि. धाराशिव मु.पो. खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर यांना त्यांचे मोबाईल नंबरवर दि. 23.09.2022 रोजी 15.53 वा ते 16.30 वा. सु कृषी कार्यालय भुम येथे अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर टेक्स्ट मेसेज पाठवून पॅनकार्ड अपडेट करा नाही तर तुमचे बॅक खाते बंद पडेल असा मॅसेजद्वारे व्हीके लॅम्पएलके लिंक पाठवल्याने फिर्यादी यांनी नमुद लिंक ओपन करुन त्यावर पॅनकार्ड नंबर व जन्मतारीख अपडेट केले असता त्यांनतर फिर्यादी यांना प्राप्त ओटीपी टाकलेने फिर्यादीचे एसबीआय बॅक खाते मधून 2,59,997₹ काढून घेवून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मिथुन वाणी यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो. ठाणे येथे कलम 420, भा.दं.वि.सं. सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम 2008 कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- वसीम अब्दुल रशीद शेख, वय 30 वर्षे, रा. खाजा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे पुतण्याचे एटीएम कार्ड अनोळखी तीन इसमांनी दि. 10.02.2024 रोजी 10.30 ते 11.00 वा. सु. पवनराजे कॉम्प्लेक्स येथील हिताची एटीएम मध्ये धाराशिव येथे हातचालाखीने एटीएम कार्ड बदलुन त्याऐवजी दुसरे एटीएम कार्ड देवून एटीएम कार्ड वरुन 11,000₹ काढून तसचे शुभम धावारे, रा. कामठा याचे देखील एटीएम कार्ड हातचालाखीने बदलुन घेवून त्याचे एटीएम मधून 20,000₹ काढून घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वसीम शेख यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 420, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.