• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : सहाय्यक पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

फिर्यादी महिलेचा हात ओढून आय लव्ह यु म्हणत किस घेण्याचा प्रयत्न

admin by admin
June 23, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव : सहाय्यक पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
0
SHARES
3.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम – बीड माहेर आणि छत्रपती संभाजीनगर सासर असलेल्या एका महिलेला मैत्रिणीच्या माध्यमातून भूम शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या घरामध्ये बोलावून, बेडरूममध्ये सोबत झोपण्याची इच्छा व्यक्त करून नंतर दुसऱ्या दिवशी आय लव्ह यु म्हणत जवळ ओढून किस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र लिंबाजी शिंदे असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या ३८ वर्षीय फिर्यादी महिलेचे माहेर बीड आहे. बीडमधील एका मैत्रिणीने या फिर्यादी महिलेशी संपर्क साधून तिला गोड बोलून कारने भूममध्ये नेले , तिथं गेल्यावर तिला समजले की, वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे हे तिचे खास मित्र आहेत. तिच्या माध्यमातून महिलांवर जाळे टाकून प्रेमसंबंध निर्माण करून शारीरिक उपभोग करीत असल्याची माहिती मिळाली.

काही दिवसापूर्वी भूम शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या घरामध्ये फिर्यादी महिलेस बोलावून, तिच्या मैत्रिणीने सपोनि रवींद्र लिंबाजी शिंदे यांच्यासोबत रात्री बेडरूममध्ये झोपण्याचे बोलून दाखवले असता, फिर्यादी महिलेने नकार दिला. त्यानंतर सकाळी किचनमध्ये असताना, सपोनि रवींद्र लिंबाजी शिंदे हे पाणी पिण्याच्या बहाण्याने मागून येऊन तिचा हात पकडला आणि आय लव्ह यु म्हणत किस घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करीत फिर्यादी महिलेने तेथून काढता पाय घेतला.

हा प्रकार ५ जून २०२४ रोजी घडला असून, गुन्हा २२ जून रोजी दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे, त्याची मैत्रिण सुनीता गोविंद मस्के आणि चालक प्रदीप या तिघांवर भूम पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ३५४, ३५४ ( A ) , ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असताना, हे गुलाबी लफडे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हा उशिरा दाखल झाल्याने आजवर कुणाचा दबाव होता, याची चवीने चर्चा सुरु आहे.

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना

Next Post

येरमाळा आणि उमरगा येथे प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

येरमाळा आणि उमरगा येथे प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group