• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव 'कुरुक्षेत्र' नवा अंक: 22

admin by admin
September 5, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव भाजपच्या कुरुक्षेत्रावर आता ‘लेटर बॉम्ब’ आणि ‘निमंत्रण पत्रिकेचा’ नवा खेळ सुरू झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत साहेबांनी (आमदार राणा पाटील) दिलेला ‘त्रास’ माजी मंत्री आणि विद्यमान विधान परिषद आमदार बसवराज पाटील चांगलेच लक्षात ठेवून आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीत असताना सुरू असलेला हा ‘पाटील विरुद्ध पाटील’ संघर्ष आता भाजपमध्ये आल्यावरही उफाळून आला असून, या ‘कोल्ड वॉर’चे रूपांतर आता थेट ‘फ्री-स्टाईल कुस्तीत’ झाले आहे.

‘जशास तसे’: घरगुती ते सार्वजनिक कार्यक्रमांत ‘नो एन्ट्री’

सगळ्या राड्याची सुरुवात झाली ती तीन महिन्यांपूर्वीच्या विधान परिषद निवडणुकीतून. बसवराज पाटील दणदणीत निवडून आले, पण साहेबांनी त्यांना पाडण्यासाठी लावलेली फिल्डिंग लपून राहिली नाही. तिथूनच साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे बसवराज पाटलांनी ठरवले. सुरुवातीला बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील यांच्या मुलीच्या नांदेडमधील साखरपुड्याला साहेबांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. तिथे जुन्या गटाचे सुजितसिंह ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना मानाने बोलावले. साहेबांनी याचा बदला घेण्यासाठी गेल्या महिन्यात ‘धाराशिव व्हिजन २०३०’चा सरकारी कार्यक्रम लावला आणि त्यात बसवराज पाटलांना ‘नो एन्ट्री’ केली! पण आता बसवराज पाटलांनी जो पलटवार केलाय, त्याने साहेबांच्या गोटात थेट भूकंप आला आहे.

आरोग्य शिबिराची पत्रिका की साहेबांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’?

येत्या ६ सप्टेंबरला मुरूम येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि शरण पाटील फाउंडेशनतर्फे एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पण या शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. जिल्ह्यातील भाजपचे एकमेव विधानसभा आमदार आणि ‘मित्रा’चे उपाध्यक्ष असलेले राणा पाटील, तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांना या पत्रिकेतून अक्षरशः ‘गायब’ करण्यात आले आहे! शासकीय राजशिष्टाचार (Protocol) धाब्यावर बसवून साहेबांचा हा जो सार्वजनिक अपमान करण्यात आलाय, तो राणा गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

दुखावर मीठ: ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

स्वतःच्याच पक्षाच्या आमदाराला पत्रिकेतून बेदखल करणाऱ्या बसवराज पाटलांनी खरी गोम पुढेच मारली आहे. त्यांनी या पत्रिकेत थेट शिवसेना उबाठा (ठाकरे गट) आमदार प्रवीण स्वामी यांना मानाचे स्थान दिले आहे! म्हणजेच, “आमच्या पंगतीत आमच्याच पक्षाच्या साहेबांना जागा नाही, पण ठाकरेंचा आमदार आम्हाला चालतो,” असा थेट आणि बोचरा संदेश यातून दिला गेला आहे. शिवाय या पत्रिकेवर साहेबांचे कट्टर राजकीय वैरी सुजितसिंह ठाकूर आणि सँडविच झालेले जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे फोटो अगदी दिमाखात झळकत आहेत.

थोडक्यात सांगायचे तर, भाजपच्या या ‘पाटील विरुद्ध पाटील’ महायुद्धात आता प्रोटोकॉल, पक्षनिष्ठा आणि शिष्टाचार सर्व काही खुंटीला टांगून ठेवण्यात आले आहे. एकाच पक्षात राहून एकमेकांचे असे जाहीर वस्त्रहरण सुरू असल्याने, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र अचंबित होऊन या राजकीय ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची मजा घेत आहेत!

Previous Post

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!