धाराशिव – येथील बसस्थानकात एका महिलेच्या पर्समधून 5 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सुष्मा दिलीप सुर्यवंशी (वय 46) या 11 ऑगस्ट रोजी गेवराई-सोलापूर बसने प्रवास करून धाराशिव बसस्थानकात उतरल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून 81 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (एकूण किंमत 5,47,445 रुपये) चोरून नेले.
याप्रकरणी सुष्मा सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात 12 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 379 अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
धाराशिव बसस्थानकात पुन्हा गर्दीचा फायदा घेत सोन्याचे लॉकेट चोरी
धाराशिव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. युसुफ हनीफ काझी (वय 67) हे 12 ऑगस्ट रोजी दुपारी 1:05 वाजता धाराशिव ते सुरत बस पकडण्यासाठी बसस्थानकात आले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या मुलाच्या गळ्यातील 23 ग्रॅम 390 मिली वजनाचे सोन्याचे लॉकेट (अंदाजे किंमत 1,50,000 रुपये) चोरून नेले.
याप्रकरणी युसुफ काझी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात 12 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 379 अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
धाराशिवमध्ये घराचे कुलूप तोडून 38,500 रुपयांचा ऐवज चोरी
धाराशिव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ राहणाऱ्या भैरवनाथ देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 38,500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
चोरीची ही घटना 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते 12 ऑगस्ट रोजी पहाटे 2 या वेळेत घडली. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या दोन मूर्ती, दोन समई, चांदीचे धोंडे आणि 5,000 रुपये रोख असा एकूण 38,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी भैरवनाथ देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
उमरग्यातून शेतकर्यांचा विद्युत पंप चोरीला
उमरगा तालुक्यातील मुळज येथील शेतकरी सतीश लक्ष्मणराव चालुक्य यांच्या शेतातील विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
10 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 11 ऑगस्ट रोजी पहाटे 5 या वेळेत चोरट्यांनी मुळज शिवारात असलेल्या चालुक्य यांच्या सर्वे नंबर 90/2 मधील विहिरीवरील 20,000 रुपये किमतीचा विद्युत पंप चोरून नेला.
याप्रकरणी सतीश चालुक्य यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
लोहारामध्ये शेतकऱ्याच्या शेळ्या, बोकड चोरीला
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मोघा येथील शेतकरी बळीराम आप्पाराव तडोळे यांच्या शेतातील शेळ्या आणि बोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत अज्ञात चोरट्यांनी तडोळे यांच्या शेत गट नंबर 135 मधील पत्र्याच्या शेडमधून चार शेळ्या आणि एक बोकड चोरून नेले. या चोरीमुळे तडोळे यांचे 33,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी बळीराम तडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
शिराढोणमध्ये गोठा फोडून 60,000 रुपये किमतीची गाय चोरी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कोथळा येथे राहुल परदेशी यांच्या शेतातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी 60,000 रुपये किमतीची गाय चोरून नेल्याची घटना घडली आहे.
ही चोरी 13 जुलै रोजी संध्याकाळी 7 ते 14 जुलै रोजी पहाटे 4 या वेळेत घडली. याप्रकरणी ज्ञानोबा उप्पाराव काळे यांनी 12 ऑगस्ट रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.