धाराशिव : फिर्यादी नामे- निमिनाथ राजाराम घोळवे, वय 69 वर्षे, रा. जिजाउनगर रेल्वे स्टेशन रोड धाराशिव जि. धाराशिव हे दि. 30.01.2024 रोजी 11.30 ते 12.10 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथे येडशीला जाणे करीता धाराशिव सुरत बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून निमिनाथ घोळवे यांचे गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निमिनाथ घोळवे यांनी दि.31.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे- नाना व्यंकट लांडगे, वय 38 वर्षे, रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 29.01.2024 रोजी 16.00 वा. सु. बालाघाट मल्टिस्टेट ढोकी रोड कळंब येथे बटाटे घेत असताना त्यांचे खिशातील अंदाजे 18,499 ₹ किंमतीचा व्हीवो वाय 35 कंपनीचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नाना लांडगे यांनी दि.31.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे- प्रमोद पुरुषोत्तम पाटील, वय 46 वर्षे, रा. भिकार सारोळा ता. जि. धाराशिव यांचे एन.व्ही.पी. शुगर प्रा लिमिटेड जागजी येथील साखर कारखाण्याचे पाठीमागील बाजूस लोखंडी कॉलम भरण्याचे काम चालु असल्याने फिर्यादी हे दररोजच्या प्रमाणे सकाळी साइडवर गेले असता त्या ठिकाणी सकाळी त्यांचे संरक्षणाकरीता दिवस रात्र पाळीचे दोन वॉचमन ठेवलेले असुन ते रात्रभर ड्युटीवर हजर असतानाही प्रमोद पाटील यांचे एन.व्ही.पी. शुगर प्रा लिमिटेड जागजी येथील साइडवरील बेस प्लेट 38 नग, बेस लोखंडी प्लेट 100 नग असा एकुण 1,10,160 ₹ किंमतीचा माल हा दि. 30.01.2024 रोजी 03.00 ते 05.00 वा. सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रमोद पाटील यांनी दि.31.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.