• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

मुख्याधिकारी वसुधा फड यांची अखेर बदली , त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार ...

admin by admin
July 1, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी पदाचा ‘संगीत खुर्ची’चा खेळ चांगलाच रंगला आहे. अवघ्या चार दिवसांत तीन अधिकारी बदलल्याने पालिकेचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर गेला असून, ‘आजचा साहेब कोण?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.

ही नाट्यमय घडामोड सुरू झाली ती मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या दीर्घ मुदतीच्या रजेमुळे , त्या गेले म्हणून अजितकुमार डोके आले, त्यांची एकच दिवसात लातूरला बदली झाली.  डोके यांची लातूरला बदली झाल्यानंतर, २७ जून रोजी तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला. मोठ्या आशेने आलेले रणदिवे केवळ एक तास खुर्चीत बसले आणि निघूनही गेले. त्यानंतर शनिवार-रविवारच्या सुट्टीने शांतता पसरली.

त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार

सोमवारी, ३० जून रोजी सकाळी, दीर्घ रजेवर गेलेल्या वसुधा फड पुन्हा एकदा कार्यालयात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यांचा हा ‘कमबॅक’ औटघटकेचा ठरला. त्याच दिवशी त्यांच्या बदलीचे आदेश धडकले आणि त्यांना पदभार सोडावा लागला.

आता या ‘संगीत खुर्ची’च्या खेळात नवा प्रवेश झाला आहे तो नगरप्रशासन विभागाचे सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांचा. त्यांच्याकडे सध्या पालिकेचा पदभार देण्यात आला आहे. मात्र, या सततच्या बदलांमुळे पालिकेतील १४० कोटींच्या वादग्रस्त रस्ते निविदेचे आणि आगामी प्रभाग रचनेच्या कामाचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

धाराशिव नगर पालिकेत मुख्याधिकारी यांच्या खुर्चीचा संगीत खेळ सुरु आहे. धाराशिव पालिकेतील प्रशासकीय गोंधळ शिगेला पोहोचला आहे. हा ‘खुर्चीचा खेळ’ आता थांबणार कधी आणि शहराच्या विकासाचे गाडे रुळावर येणार कधी, याकडेच धाराशिवकरांचे डोळे लागले आहेत.

Previous Post

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

Next Post

१०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

Next Post
१०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

१०८ रुग्णवाहिका चालकांचे 'काम बंद' आंदोलन सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group