धाराशिव : मयत नामे- सुनिल दत्तात्रय कुलकर्णी, वय 60 वर्षे, रा. समता नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.18.11.2023 रोजी 20.30 वा. सु. गडपाटीचे पुढे राष्ट्रीय महामार्गावरुन एव्हरग्रीन मोटरसायकल वर बसून जात होते. दरम्यान अज्ञात लोडेड वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवुन सुनिल कुलकर्णी यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात सुनिल कुलकर्णी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- सुनिता सुनिल कुलकर्णी, वय 48 वर्षे, रा. समता कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब), मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरोपी नामे- अतुल मारुती वाघमोडे, रा. अंबेजवळगा ता. जि. धाराशिव व सोबत मयत नामे- अनिता नवनाथ हाजगुडे, वय 45 वर्षे, रा. अंबेजवळगा ता. जि. धाराशिव हे दोघे दि.21.11.2023 रोजी 12.15 वा. सु. कौडगाव ते कौडगाव वस्तीच्या मध्ये असलेलृया स्मशानभुमी जवळुन मोटरसायकल क्र एमएच 25 एच. वाय 7556 वर बसून जात होते.
दरम्यान आरोपी अतुल वाघमोडे यांनी त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवल्याने मयत नामे अनिता हाजगुडे या मोटरसायकल वरुन खाली पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- प्रदीप नवनाथ हाजगुडे, वय 22 वर्षे रा. अंबेजवळगा ता. जि. धाराशिव यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
वाशी : आरोपी नामे-1)संतोष मधुकर शिनगारे, वय 40 वर्षे, रा. पारा, ता. वाशी जि. धाराशिव, 2) दत्तात्रय निवृत्ती भराटे, वय 38 वर्षे, रा. पारा ता. वाशी जि. धाराशिव या दोघांनी दि.02.12.2023 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे क्रुजर क्र एमएच 13 डी.ई. 9304 व क्रुजर क्र एमएच 13 डी. ई. 3197 ही वाहने वेगवेगळ्या दोन ठिकाणी पारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये वाशी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.