• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा नवा शिगोशारा – मंदिरात ड्रेसकोड!

admin by admin
February 5, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नॉन क्रिमिलियर प्रकरण: डॉ. ओंबासे यांच्यावर कारवाई होणार का?
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराच्या धर्तीवर तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्याचा धडाका जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी लावला आहे. मंदिर समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पण या निर्णयाला पाळीकर पुजार्यांनी त्वरित “नको रे बाबा!” म्हणत विरोधाचा नारळ फोडला.

या निर्णयाच्या आश्चर्यकारक टायमिंगमुळे जिल्हाधिकारी ओंबासे यांच्या डोक्यात हा ड्रेसकोडचा बाण नक्की कुठून आला, असा प्रश्न पडतो. अलीकडेच त्यांच्या बनावट नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र प्रकरणाने खळबळ माजवली होती. त्यामुळे त्यांच्या आसपासचा “बातमीस्फोट तज्ज्ञ” गट आता नवनवीन फटाके टाकत जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत असल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही अशीच ड्रेसकोडची घोषणा केली होती. पण म्हणतात ना, “आई तुळजाभवानीच्या दरबारी उर्मटपणा चालत नाही!” त्यामुळे तो विषय चक्क दगडाखाली गाडला गेला होता. मात्र, जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा तो उकरून काढण्याचा मोह आवरला नाही.

“साहेबांचे फुंकनार पत्रकार कोण?”

जिल्हाधिकारी ओंबासे यांचे स्टेटमेंट म्हणजे दिवसभराच्या वैतागलेल्या पत्रकारांसाठी विनोदाचा खजिना असतो, असे चर्चेच्या गोटात म्हटले जाते. साहेबांकडे एक खास “खुशमस्करी” पत्रकार असल्याचे सांगितले जाते, जो रोज त्यांच्या कानात गोड गोड “बातमीबाण” फुंकतो. त्यामुळे साहेबही “आज काय स्टेटमेंट टाकावे?” याचा खेळ रोज रंगवत असतात.

“ड्रेसकोड का आणि कशासाठी?”

  • मंदिरात ड्रेसकोड लागू झाल्यावर भजन-मंडळाच्या मावशा साडीतून सलवार-कुर्त्यावर जातील का?
  • शॉर्ट्स घालणारे पर्यटक आता पायजमा घालून ‘प्रवेश सवलती’ मागतील का?
  • आणि सगळ्यात महत्त्वाचे – मंदिराच्या बाहेर ‘ड्रेस कोड प्रमाणपत्र’ बनवणाऱ्या टपऱ्या उघडल्या जातील का?

हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत. पण एक मात्र नक्की – साहेबांचे नवीन स्टेटमेंट केव्हा आणि कुठून येईल, याचा नेम नाही!

 

Previous Post

धाराशिवचे कलेक्टर डॉ. सचिन ओम्बासे चौकशीच्या फेऱ्यात

Next Post

तेरखेडा: फटाक्यांचा स्फोट, चौकशीचा ढिसाळ अहवाल आणि प्रशासनाचा बूमरँग!

Next Post
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट, आठ जखमी

तेरखेडा: फटाक्यांचा स्फोट, चौकशीचा ढिसाळ अहवाल आणि प्रशासनाचा बूमरँग!

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन धाडसी चोरी!

July 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर बायपासवर पोलिसांची मोठी कारवाई! एक्सयुव्ही ५०० कारमधून चाललेली २०० किलो गोवंशीय मांसाची तस्करी उधळली

July 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंबमध्ये भररस्त्यात थरार! देशमुख हॉस्पिटलसमोर तरुणावर दगडाने प्राणघातक हल्ला

July 17, 2026
वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

July 17, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना; दागिने, रोकड व दोन कालवडी लंपास

July 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!