• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव दुहेरी हत्याकांड: चार वर्षांपूर्वीच्या वादातून रक्तरंजित बदला; संशयित पिता-पुत्र फरार

admin by admin
August 14, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव तालुक्यात जमिनीच्या वादातून पती-पत्नीचा निर्घृण खून, आरोपी फरार
0
SHARES
3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तालुक्यातील करजखेडा येथे शेतीच्या बांधावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सहदेव पवार (४२) आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार (३७) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी संशयित आरोपी जीवन चव्हाण आणि त्याचे वडील हरिबा चव्हाण घटनेनंतर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार दांपत्य आपल्या दुचाकीवरून (एमएच २५, एयू ४७४३) करजखेडा येथून पाटोदा चौरस्त्याकडे जात होते. यावेळी समोरून कारने (एमएच २४, एएफ ४०६५) येत असलेल्या संशयित जीवन चव्हाण व त्याचे वडील हरिबा चव्हाण यांनी पवार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे पवार पती-पत्नी रस्त्यावर कोसळले. त्यानंतर जीवन, हरिबा आणि त्यांच्यासोबतच्या इतर साथीदारांनी दोघांना रस्त्यावर ओढून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंका पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सहदेव पवार यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. 

चार वर्षांपूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी

मृत सहदेव पवार आणि संशयित आरोपी हरिबा चव्हाण यांच्यात गेल्या चार वर्षांपासून शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता. चार वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका भांडणात सहदेव पवार यांनी हरिबा चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची बोटं छाटली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहदेव पवार तीन वर्षे तुरुंगात होते आणि केवळ १५ दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आले होते. याच रागातून आणि बदल्याच्या भावनेतून चव्हाण पिता-पुत्राने कट रचून हे दुहेरी हत्याकांड घडवले असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. बेंबळी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  या घटनेमुळे करजखेडा गावावर शोककळा पसरली आहे.मयत सहदेव पवार (४२) आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार (३७) यांना दोन छोट्या मुली आहेत.

करजखेडा दुहेरी हत्याकांड: अवघ्या २४ तासांत आरोपी पिता-पुत्राला पुण्यातून अटक

करजखेडा दुहेरी हत्याकांड : सूडाचे भयाण वास्तव आणि कायद्याचा वचक

Previous Post

 फेसबुक पिंट्या आणि १६०० कोटींचा सत्कार!

Next Post

करजखेडा दुहेरी हत्याकांड: अवघ्या २४ तासांत आरोपी पिता-पुत्राला पुण्यातून अटक

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

करजखेडा दुहेरी हत्याकांड: अवघ्या २४ तासांत आरोपी पिता-पुत्राला पुण्यातून अटक

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group