पुणे – धाराशिवचे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव आणि त्यांची पत्नी प्रतीक्षा शिरीष यादव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप आहे.
शिरीष यादव हे पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी बेकायदेशीररित्या १ कोटी ३८ लाख ७४ हजार रुपये इतकी संपत्ती जमवली होती. ACB च्या गोपनीय चौकशी दरम्यान, यादव यांच्या पत्नीने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप देखील लावण्यात आला आहे.
शिरीष यादव हे सध्या धाराशिवला निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी असून, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी आहेत. शिरीष यादव यांच्याविरुद्ध यापूर्वी दोनदा लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा (एसआरए) उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यास पाच लाखांची लाच घेताना ‘एसीबी’ने ९ वर्षांपूर्वी अटक केली होती. . त्याच्या घराच्या झडतीत ५१ लाख रुपये रोख, २२ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व पाच महागडे मोबाइल जप्त करण्यात आले.
“भ्रष्टाचाराचे जाळे: उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांचे प्रशासनातील काळे कारनामे उघडकीस”
मात्र, या संपत्तीबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे यादव संगितल्याने त्याचा स्रोत उलगडण्यात एसीबीला अद्याप यश आले नव्हते.. विविध बँकांत असलेल्या त्याच्या लॉकरमध्येही मोठ्या प्रमाणावर मौल्यवान ऐवज असण्याचा एसीबीला संशय होता. त्याची तपासणी केली जात आहे. तसेच यादवच्या मोबाइलमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जमा शिल्लक रकमेबाबत संदेश आहेत. यादवने विदेशातही दौरे केल्याची माहिती आहे. एसीबीने पासपोर्टबाबत माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. यापूर्वी पुणे मनपात बांधकाम टीडीआर घोटाळाप्रकरणी यादववर गुन्हा दाखल आहे. २००७ ते २०१२ दरम्यान त्याची उघड चौकशी केली असता त्यात त्याच्याकडे अडीच लाखांची अपसंपदा सापडली होती.