धाराशिव – जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे. पोलिस या घटनांचा तपास करत आहेत आणि आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कळंब तालुक्यातील सटवाईवाडी येथे 31 जुलै रोजी रात्री 9 वाजता तानाजी पवार यांना त्यांच्या पत्नी, भावजय दिपाली आणि भाऊ धनंजय यांच्यासह मारहाण करण्यात आली. दीपक दिलीप फरताडे, रितेश चंदु फरताडे, सुधाकर भगवान फरताडे, प्रिती दीपक फरताडे, आदित्य बाळू फरताडे आणि वत्सला दिलीप फरताडे या सहा जणांनी मिळून मागील भांडणाचा राग म्हणून पवार कुटुंबीयांवर हल्ला केला. आरोपींनी डोळ्यात चटणी टाकून, लाथाबुक्क्यांनी आणि चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी तानाजी पवार यांनी 3 ऑगस्ट रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 117(2), 115(2), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तुळजापूर येथे 2 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता घाटशिळा पार्किंग सुलभ शौचालयासमोर अमोल महादेव नन्नवरे यांना मारहाण करण्यात आली. विक्रम नाईकवाडी, काका गव्हाणे, प्रदीप भोसले, काका देशमुख, संग्राम नाईकवाडी आणि इतर चार जणांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून नन्नवरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी अमोल नन्नवरे यांनी 3 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 189(2), 191(2), 190, 118(1) 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.