धाराशिव – धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांचा भ्रष्ट कारभार धाराशिव लाइव्हने दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी उघडकीस आणला होता. प्रतिनियुक्तीचे कोणतेही अधिकार नसताना, अधिकाराचा गैरवापर करून , तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी ८ ते १० वैद्यकीय अधिकारी आणि ४२ परिचारिकायांना प्रतिनियुक्ती दिली होती. याप्रकरणी अखेर सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. पण जिल्हा शल्य मोठा की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन मोठ्या यावरून वाद सुरु आहे. येथे कुणी कोणाचे ऐकत नाही, त्यामुळे सर्व कारभार राम भरोसे सुरु आहे.
त्यात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये ४० ते ५० हजार घेऊन ८ ते १० वैद्यकीय अधिकारी आणि ४२ परिचारिकायांना प्रतिनियुक्ती दिली होती, जिल्ह्यात इतरत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धाराशिवला प्रतिनियुक्ती देण्यात आली होती.
त्याचा भांडाफोड धाराशिव लाइव्हने केल्यानंतर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांची मुरुडला उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर याची चौकशी होऊन ८ ते १० वैद्यकीय अधिकारी आणि ४२ परिचारिकायांना प्रतिनियुक्ती रद्द ककरण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ४० ते ५० हजार रुपये वाया गेले आहेत.
जुनी बातमी वाचा
४० ते ५० हजार रुपये द्या आणि प्रतिनियुक्ती घ्या