धाराशिव: महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही धाराशिव जिल्ह्यात गुटख्याची राजरोस विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कर्नाटक राज्यातील हुमनाबाद येथून येणारा गुटखा मुरूम पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्ह्यात प्रवेश करतो आणि संपूर्ण धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यात पोहोचवला जातो.
विमल, गोवा, हिरा, हिना, आरएमडी, रजनीगंधा , बादशहा नावाचा गुटखा पानटपरी, हॉटेल्स आणि किराणा दुकानांमध्ये खुलेआम विकला जात आहे. गुटखा वाहतूक करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाकडून किमान २० हजार रुपये हप्ता म्हणून वसूल केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दररोज अनेक गाड्या गुटख्याची वाहतूक करतात आणि पोलिसांना हप्ता देतात.
मुरूम पोलीस स्टेशनचा वसूलदार हा हप्ता अन्य पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना पोहोचवतो. स्थानिक गुन्हे शाखा, मुरूम, नळदुर्ग, तुळजापूर आणि येरमाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी या हप्तावसुलीतून मालामाल होत असल्याचा आरोप आहे.
यामुळे, गुटख्याच्या अवैध विक्रीमुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात येत असून, पोलिसांची प्रतिमाही मलीन होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
एक गुटखा गाडी पकडल्यानंतर मुरूम वसूलदार रणखांब आणि गुटखा विक्रेता यांच्यातील संवाद आणि व्हिडीओ धाराशिव लाइव्हच्या हाती लागला आहे.
संपूर्ण व्हिडीओ पाहा