धाराशिव – सार्वजनिक डीपी रस्त्याची जागा हडप करणाऱ्या शहरातील एका नामांकित डॉक्टरवर धाराशिव नगरपरिषदने पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सचिन राजेंद्र गुंजाळ,रचना सहाय्यक, नगररचना विभाग, नगरपरिषद धाराशिव यांनी मुख्याधिकारी नगर परिषद, धाराशिव यांना धाराशिव येथील सर्वे नं. 105 मधील विकास योजनेतील 18 मीटर रुंदीचा रस्ता जो की नगरपरिषदेच्या मालकी व ताब्यात असून सदर त्या रस्त्याबाबत.उदयसिंह प्रकाशराव निंबाळकर यांनी दि.02.01.2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरुन मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांनी सुनावणी घेऊन व चौकशी करुन दि.20.03.2024 रोजी नगररचना विभागाचा अहवाल व नगर परिषदेचे कायदेशीर सल्लागार यांचा अभिप्राय घेऊन, चंद्रकांत रंगनाथ काकडे व डॉ. श्रीकांत बब्रुवान बलवंडे यांना नोटीस देऊन त्यांना म्हणणे दाखल करण्याची संधी देऊन सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दि.22.03.2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणेबाबत आदेश पारीत केलेला होता.
त्यामध्ये नगरपरिषदेचे कायदेशीर सल्लागार यांच्या अहवालानुसार डॉ. श्रीकांत बब्रुवान बलवंडे व चंद्रकांत रंगनाथ काकडे यांनी नगर परिषदेच्या मालकीच्या व ताब्यातील विकास योजनेतील 18 मीटर डी.पी. रस्त्याचे बाधीत 9 मीटर क्षेत्र नगर परिषदेच्या परस्पर दि.10.02.2022 रोजी चुक दुरुस्ती पत्र या सदराखाली बनावट व बेकायदेशीर दस्त तयार करुन त्याद्वारे नगरपरिषद व शासनाची फसवणूक केली आहे म्हणून डॉ.श्रीकांत बब्रुवान बलवंडे यांचेवर भारतीय दंड संहिता 1866 चे कलम 420 व 406 नुसार आनंद नगर, पोलीlस्टेशन धाराशिव येथे FIR No.0143 / 2024 दि.24.04.2024 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-1)श्रीकांत बब्रुवान बलवंडे, रा. शिक्षक कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी चंद्रकांत रंगनाथ काकडे यांचे कडून धाराशिव विकास हद्दीतीन सर्व नं 105 मधील 30 गुंठे जमीनीचे दस्त क्र 3959/2004 प्रमाणे नोंदवून त्यापैकी 988 चौरस मिटर नगर परिषद धाराशिव यांना हस्तांरित करुन त्यांची रेखांकन मंजुरी घेवून दि. 10.02.2022 रोजी दस्त क्श्र 827/2022 प्रमाणे चुक दुरुस्तीच्या नावखाली बेकायदेशीरपणे दस्त तयार करुन चुकीच्या चतुरसिमा दर्शवुन मुळ मालक चंद्रकांत रंगनाथ काकडे यांचे क्षेत्र असल्याचे दर्शवून नगरपरिषद व शासनाची फसवणुक केली आहे.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन राजेंद्र गुंजाळ, वय 27 व्यवसाय नोकरी रचना सहाय्यक नगर परिषद धाराशिव यांनी दि.24.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 406, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.