• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव तहसीलदारांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकाऱ्यांचा ठेंगा

व्यापारी रामचंद्र बांगड यांचे अतिक्रमण नेमके कुणी काढायचे ? वाद पेटला

admin by admin
February 23, 2024
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकाऱ्याकडून केराची टोपली
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करणाऱ्या व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे. जिल्हाधिकारी पाठोपाठ तहसीलदार यांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केराची टोपली दाखवत बांगड यांचे अतिक्रमण काढण्यास असमर्थता दर्शवली आहे. तहसीलदारांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकाऱ्यांनी ठेंगा दाखवल्याने उलट – सुलट चर्चा सुरु आहे.

तुळजापूर रोडवरील जनता बँकेसमोर ( सर्व्हे नंबर २४० ) मध्ये व्यापारी रामचंद्र बांगड यांनी नगर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करण्यात आले आहेत. नगर पालिकेची जागा असताना, बांगड यांनी नगर पालिकेकडून बांधकाम परवाना न घेता, मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकाम करून पत्र्याचे शेड्स उभे करत असताना त्यांना नोटीसा देऊनही त्यांनी बांधकाम न थांबवल्याने बांगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी, स्वच्छता विभागाचे लिपिक गोरख रणखांब यांना २३ ऑगस्ट रोजी दिला होता. पण केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आदेश काढून पालिका मुख्याधिकारी वसुधा फड गप्प होत्या तर शहरात एकच अतिक्रमण आहे का ? असे म्हणून पोलीस निरीक्षक उस्मान शेख दुर्लक्ष करीत होते.

व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याकडुन पालिका मुख्याधिकारी वसुधा फड आणि पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना खुश करण्यात आल्याने गुन्हा दाखल होत नव्हता. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर व्यापारी रामचंद्र बांगड यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ च्या ५३ ( ७ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे.

याप्रकरणी माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनाचार महिन्यापूर्वी दिले होते. . या दोघांनी संयुक्त मोहीम आखून कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले होते. त्यानंतर तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी आपल्यावरील जबाबदारी नगर पालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यावर ढकलली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याप्रमाणे १२ फेब्रुवारी २०२४ रोजी आदेश काढून , बांगड यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. आज आदेश निघून आठ दिवस झाले तरी, कोणतीही हालचाल दिसत नाहीत. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या आदेशाला न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केराची टोपली दाखवत बांगड यांचे अतिक्रमण काढण्यास असमर्थता दर्शवली आहे.

बांगड यांनी अतिक्रमण केलेली जागा ही महसूल विभागाची असल्याने त्यांचे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी तहसीलदारांची असल्याचे न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी कळवले आहे. तहसीलदार आणि मुख्याधिकारी हे एकमेकावर जबाबदारी ढकलत बांगड यांचे अतिक्रमण काढण्यास टोलवाटोलवी करीत आहेत.दरम्यान, . बांगड यांच्याकडुन कोण किती लाच घेतली, याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

Previous Post

सांज्यात पिकअपने धडक दिल्याने एक ठार

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: सर्व आरोपींना २० एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे ‘फायनल’ आदेश; निकालाची प्रतीक्षा लांबणीवर

March 24, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

उत्तरपत्रिका तपासणीचा घोळ: धाराशिवच्या अधिकाऱ्यांचा ‘नोटीस चुकून आली’ असा दावा; प्रशासनात संभ्रम

March 24, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना: शेतीमाल, मोटारीची वायर आणि दुचाकी लंपास; पोलिसांत गुन्हे दाखल

March 24, 2026
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

मुलाच्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून वडील आणि चुलत्यावर जीवघेणा हल्ला; १२ जणांवर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

March 24, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वीज उपकेंद्रात घुसून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की; दोन तास वीजपुरवठा खंडित करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

March 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group