धाराशिव : मयत नामे-1) बाबु शंकर गायकवाड, वय 70 रा. सांजा, ह.मु. छत्रपती शिवाजी नगर बायपास रोड धाराशिव हे दि.21.02.2024 रोजी 15.00 ते 15.30 वा. सु. त्यांचे राहाते घरुन महादेव मंदीर सांजा चौक धाराशिव येथे दर्शनाला पायी जात होते. दरम्यान साईकमल हॉटेल जवळ एनएच 52 रोडवर सांजा चौक येथे महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन क्र एमएच 15.एचएच 8425 चा चालकाने त्याचे ताब्यातील पिकअप हे हायगीयीने व निष्काळजीपणे चालवून बाबु गायकवाड यांना पाठीमागून धडक दिली.
या अपघातात बाबु गायकवाड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद पिकअप चालक हा अपघाताची माहिती न देता व जखमीस उपचार कामी घेवून न जात अपघात करुन पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव बाबु गायकवाड, वय 45 वर्षे, रा. सांजा ह.मु. छत्रपती शिवाजी नगर बायपास रोड धाराशिव यांनी दि.22.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 134 (अ)(ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
तामलवाडी – आरोपी नामे-1)विशाल चंदु चव्हाण,रा. शिवाजी नगर खडकी तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.02.2024 रोजी 11.45 वा. सु. गोडसे यांचे शेताजवळ खडकी येथे फिर्यादी नामे- कालु बंडु जाधव, वय 34 वर्षे, रा. शिवाजीनगर खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन ए लंगड्या असे म्हणून त्याचे अपंगत्वावर बोलून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठी, लोखंडी टॉमीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कालु जाधव यांनी दि.22.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, भा.दं.वि.सं. सह कलम 91 अपंग व्यक्तीचा अधिकार 2016 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.