धाराशिव : शिवजयंती मिरवणुकीत डीजे लावून डान्स करणाऱ्या तरुणांना अटकाव करून , डीजे बंद केला म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांना गळा दाबून लाथाबुक्यांनी मारहाण करणाऱ्या दहा जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-1) संजय लोखंडे, 2) तुषार शिंदे, 3) शिवा नलावडे, 4) बंडु देशमुख, 5) गणेश वीर, 6) नितीन शिंदे, 7) सुनिल शेळके, सर्व रा. योडशी ता. जि. धाराशिव, 8) डी जे वाहन क्र एमएच 01 एलए 2660 चा मालक, 9) डी जे वाहन क्र एमएच 04 एफपी 4731 चा चालक, 10) डी जे वाहन क्र एमएच 14 5814 चा चालक, इतर 20 ते 30 अनोळखी इसमांनी दि. 21.02.2024 रोजी 22.00 ते 22.30 वा. सु. शहाजी चौक येथे शिवजयंती मिरवणुकीत नमुद आरोपी हे बेकायदेशीररित्या डी.जे. वाजवून गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करत असताना सदर डी.जे. बंद करणे कामी फिर्यादी नामे- श्रीगणेश साहेबराव कानगुडे, वय 48 वर्षे, पोलीस निरीक्षक ने पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण हे पोलीस पथक सह गेले असता नमुद आरोपींतानी जमावास चिथावणी देवून फिर्यादी व पोलीस पथकास चारही बाजूने घेरून शासकीय कामात अडथळा निर्माण करुन फिर्यादी यांचा जिव लाईल अशा प्रकारे गळा दाबून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.
याप्रकरणी फिर्यादी नामे- फिर्यादी नामे- श्रीगणेश साहेबराव कानगुडे, वय 48 वर्षे, पोलीस निरीक्षक ने पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम कलम 117,504, 141, 143, 147, 149, 308, 294, 353, 332, 152, 189,341, भा.दं.वि.सं. सह कलम 37(1)(3) 135 मपोका सह कलम 7 फौजदारी सुधाराणा कायदा अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.