• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, December 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या बनावट ‘पीए’चा सुळसुळाट

१२ ते १५ टक्क्यांची उघड वसुली, माजी आमदारासह दलालांची कोट्यवधींची लूट!

admin by admin
April 3, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या बनावट ‘पीए’चा सुळसुळाट
0
SHARES
698
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – जिल्हा नियोजन समिती’ (District Planning Committee) च्या २५० कोटीच्या कामांना स्थगिती दिल्यानंतर भाजप आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ही स्थगिती का देण्यात आली, याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे आ. कैलास पाटील यांनी दिले आहे. त्यावर भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर एक खळबळजनक खुलासा केला आहे.

जिल्ह्यातील विकास कामांच्या नावाखाली टक्केवारीचा बेकायदेशीर धंदा जोमाने सुरु होता.  राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या नावाचा वापर करून काही मंडळींनी अक्षरशः दलालीचा बाजार मांडला होता. बनावट स्वीय सहाय्यक, एका माजी आमदारासह शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक असलेला कार्यकर्ता – हे सारे मिळून ‘काम मंजूर करून देतो’ म्हणून १२ ते १५ टक्के वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर हा कामांना स्थगिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, सरनाईक यांनी पहिल्याच बैठकीत “एक रुपयाही न घेता दर्जात्मक कामे व्हावीत” असा निर्धार केला होता. मात्र, त्यांच्या नावाने, त्यांच्या ‘बगलबच्च्यांनी’ थेट ‘पालकमंत्र्यांचा पीए आहे’ अशी बतावणी करत गावनिहाय कामांची यादी गोळा केली आणि लोकांकडून कोट्यवधी रुपये टक्केवारी म्हणून उकळले.

सरनाईक यांची बदनामी, चांडाळ चौकटींचा व्यापार!

या बनावट नेटवर्कमध्ये खुद्द पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असल्याचीही चर्चा सुरू आहे. लोकांना असं सांगितलं जातं की, “साहेब माझ्यावर विश्वास ठेवतात, मी थेट त्यांच्याशी संपर्कात आहे”, आणि मग सुरू होतो ‘टक्केवारीचा सौदा’.
ज्यांना हे काम मंजूर मिळणार असं सांगण्यात आलं, त्यांनी आत्मविश्वासाने पैसे दिले – आणि आता कामांना स्थगिती मिळाल्याने सगळा घोटाळा उघड झाला.

संपर्क कार्यालयात दलालांचा वावर, CCTV उघड करणार सत्य

पालकमंत्र्यांचं अधिकृत संपर्क कार्यालय हे जिल्हा नियोजन समितीच्या तळमजल्यात असून, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास अनेक बाबी बाहेर येऊ शकतात. मंत्री उपस्थित नसतानाही या कार्यालयात दलालांचा मुक्त वावर सुरू आहे, हे विशेष!

हजार कोटींची कामं, कोट्यवधींची दलाली!

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे २५० कोटींच्या कामांना मंजुरी अपेक्षित असताना, या मंडळींनी १००० ते १२०० कोटींच्या कामांची बनावट यादी तयार करून १२ ते १५ टक्के टोल उकळला आहे.
ही रक्कम थेट दलालांकडे दिली गेल्याची माहिती असून, आता काही जण फरार झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर दलाल घाबरले आणि देणारे हादरले!

भाजप नेत्याचा गौप्यस्फोट – “आम्हीच तक्रार केली!”

भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की –

“सत्ताधारी पक्षातील एका माजी आमदाराच्या दोन खासगी सहाय्यकांनी, आणि पालकमंत्र्यांच्या दोन सहाय्यकांनी टक्केवारी घेतली. आम्ही स्वतः हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला. त्यानंतरच ही कामं स्थगित करण्यात आली.”


शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक – ओमराजेंपासून कैलास पाटीलपर्यंत फडणवीस सरकारवर घणाघात!

या सगळ्या प्रकारावर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.

“सभागृहात म्हणायचं ‘मी काही उद्धव ठाकरे नाही’, आणि इथे जिल्हा नियोजनची २५० कोटींची कामं स्थगित करायची?”
असा सवाल विचारत त्यांनी सरकारवर ‘दुहेरी भूमिके’चा आरोप केला.


‘दर्जात्मक कामं’ नव्हे, दलालीचा धंदा’!

‘दर्जात्मक कामे’ ही पालकमंत्र्यांची घोषणा आता ‘दलालांची दलाली’ बनली असल्याची टीका जनतेतून होत आहे.
या प्रकरणात फक्त स्थगिती देऊन भागणार नाही, तर उच्चस्तरीय चौकशी आवश्यक आहे.


थोडकं सांगायचं तर:

  • टक्केवारीच्या गैरव्यवहारात माजी आमदार व पालकमंत्र्यांचे सहाय्यक सहभागी?

  • शिवसेना (ठाकरे) आक्रमक – “फडणवीस सरकार विकास थांबवत आहे!”

Previous Post

भूम : घनकचरा व्यवस्थापन भ्रष्टाचार प्रकरण — आत्मदहनाचा प्रयत्न करून चौकशीची मागणी

Next Post

राज्य सरकारकडून पीक विम्यापोटी २३५९ कोटी जमा, शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार

Next Post
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

राज्य सरकारकडून पीक विम्यापोटी २३५९ कोटी जमा, शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा

​धाराशिव नगर परिषद निवडणूक: मतदानाच्या पूर्वसंध्येला ‘फेक एक्झिट पोल’ने खळबळ; सोशल मीडिया पेजेसवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

December 1, 2025
लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला; ढोकीत जाळून टाकलेल्या ‘राणी’च्या हत्येचा थरार उघड

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला; ढोकीत जाळून टाकलेल्या ‘राणी’च्या हत्येचा थरार उघड

November 30, 2025
धाराशिव नगर परिषद निवडणूक: प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी २५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा ‘बॉम्ब’!

धाराशिव नगर परिषद निवडणूक: प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी २५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा ‘बॉम्ब’!

November 30, 2025
धाराशिव नगर परिषद निवडणूक: शिवसेनेच्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मुसंडी

धाराशिव नगर परिषद निवडणूक: शिवसेनेच्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मुसंडी

November 30, 2025
‘खरेपणा’ आणि राणा पाटलांचा संबंध नाही; बिहारशी तुलना करून जनतेचा अपमान करू नका

धाराशिव नगरपरिषद निवडणूक : धाराशिवमध्ये भाजपचा ‘वचननामा’ प्रसिद्ध; ठाकरे गटाची ‘स्थगिती नामा’ म्हणत खोचक टीका!

November 30, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group