• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

राज्य सरकारकडून पीक विम्यापोटी २३५९ कोटी जमा, शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार

 - आ. राणाजगजितसिंह पाटील

admin by admin
April 3, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  महाराष्ट्र राज्य शासनाने पीक विम्याचा राज्य सरकारचा आणि शेतकऱ्यांच्या हिश्याचा मिळून एकूण २ हजार ३५९ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय कृषी विमा कंपनीकडे (AIC) जमा केला आहे. यामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना, विशेषतः खरीप २०२४ हंगामातील पीक नुकसानीची भरपाई लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्र) संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

आमदार पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाने विमा हप्त्याची रक्कम जमा केल्यामुळे आता पुढील प्रक्रिया वेगाने पार पडेल. केंद्र सरकारच्या कृषी विमा कंपनीकडून (AIC) ही रक्कम पुढील दोन दिवसांत संबंधित जिल्ह्यांतील विमा कंपन्यांना वितरीत केली जाईल. त्यानंतर लगेचच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. खरीप २०२२ पासून प्रलंबित असलेला राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीला उपलब्ध करून देण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता, असेही त्यांनी नमूद केले.

धाराशिव जिल्ह्याबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, खरीप हंगाम २०२४ मध्ये जिल्ह्यातील ७,१९,१६७ शेतकऱ्यांनी ५,७९,८१६ हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतले होते. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ५,४९,७९१ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दाखल केल्या होत्या, त्यापैकी ५,३२,८२६ पूर्वसूचना पात्र ठरल्या आहेत. या पात्र शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक, म्हणजे ४,७०,०७२ शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजे ६,००० ते ६,५०० रुपये विमा भरपाई मिळण्याची शक्यता आहे. तसेच, काढणीपश्चात झालेल्या नुकसानीसाठी पात्र ठरलेल्या ६०,७८२ तक्रारींनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ७,००० ते ११,००० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे.

राज्य सरकारने निधी जमा केल्याने आता जिल्ह्यातील ५.३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २५० कोटींहून अधिक रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या बनावट ‘पीए’चा सुळसुळाट

Next Post

धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा

Next Post
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा

धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!