धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बंधारे देखील वाहून गेले आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार कैलास पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.
आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीला तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
कळंब तालुक्यातील संजीतपूर गावाच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. गावकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.