• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये रुग्णालयावर जमावाचा हल्ला; डॉक्टर दांपत्याला मारहाण, वाहनांची तोडफोड

admin by admin
June 25, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये रुग्णालयावर जमावाचा हल्ला; डॉक्टर दांपत्याला मारहाण, वाहनांची तोडफोड
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरातील पार्वती हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळाल्याच्या कारणावरून एका रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलवर दगडफेक करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालय केवळ ५०० मीटर अंतरावर असताना हा दहशतीचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

धाराशिव शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या पार्वती हॉस्पिटलमध्ये काल (मंगळवार) रात्री साधारण ९:१० वाजता ही घटना घडली. डॉ. कुलदीप सस्ते आणि डॉ. दीपिका सस्ते यांच्या या खासगी रुग्णालयात एक अनोळखी रुग्ण उपचारासाठी आला होता. मात्र, रुग्णालयाची बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) बंद झाल्यामुळे डॉक्टरांनी उपचार करणे शक्य नसल्याचे सांगितले.

यावरून रुग्ण आणि त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला जाऊन त्यांनी रुग्णालयावर दगडफेक करण्यास आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी फोन करून आपल्या आणखी सहकाऱ्यांना बोलावून घेतले, त्यानंतर मोठ्या जमावाने रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ घातला. त्यांनी हॉस्पिटलबाहेर लावलेल्या वाहनांची आणि दिसेल त्या वस्तूची तोडफोड केली, तसेच परिसरातील नागरिकांनाही मारहाण केली. हा सर्व प्रकार सुमारे १० मिनिटे सुरू होता, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पार्वती हॉस्पिटल हे आनंद नगर पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. एवढ्या जवळ असूनही हल्लेखोर १० मिनिटे धुडगूस घालत होते, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर डॉ. सस्ते दांपत्याने आनंद नगर पोलीस ठाण्यात जमावाविरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ज्या रुग्णामुळे हा वाद सुरू झाला, त्याला नंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे शहरातील डॉक्टरांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिस्ट्स अँड प्रॅक्टिशनर्स (ACLAP) कडून कारवाईची मागणी

धाराशिव –  धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीच्या आणि मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ, असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिस्ट्स अँड प्रॅक्टिशनर्स (ACLAP) या संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे. 

निवेदनानुसार, पार्वती हॉस्पिटलमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी केलेल्या तोडफोडीमुळे आणि कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या मारहाणीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे संघटनेने म्हटले आहे. 

ACLAP संघटनेने या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत:

  • घडलेल्या घटनेची तात्काळ चौकशी करण्यात यावी. 
  • गुन्हेगारांवर त्वरित कारवाई व्हावी. 
  • हॉस्पिटल व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी. 

या मागण्या मान्य न झाल्यास, नाइलाजास्तव वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. 

हे निवेदन ACLAP च्या धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात आले असून, त्यावर जिल्हाध्यक्ष सतेशकुमार मोहन सस्ते, जिल्हा उपाध्यक्ष अशोक बासुदेव नाडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय बाबुराव घुले, जिल्हा सचिव सुभाष मारुती जावळे आणि जिल्हा खजिनदार अंगद भगवान चांभारे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची नावे आहेत. 

संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

Previous Post

आयएएस होण्यासाठी बोगसगिरी? ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीनंतर प्रशासनात भूकंप, केंद्राकडून चौकशीचे थेट आदेश!

Next Post

धाराशिव पालिकेचा अजब कारभार: स्वतःचा जेसीबी धूळ खात, भाड्याच्या जेसीबीतून मात्र ‘मलिदा’ खात!

Next Post
धाराशिव पालिकेचा अजब कारभार: स्वतःचा जेसीबी धूळ खात, भाड्याच्या जेसीबीतून मात्र ‘मलिदा’ खात!

धाराशिव पालिकेचा अजब कारभार: स्वतःचा जेसीबी धूळ खात, भाड्याच्या जेसीबीतून मात्र 'मलिदा' खात!

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

September 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांना मोठ्या आव्हानांचा सामना

‘प्रसाद कोंडे-देशमुख माझे OSD-PA नव्हते’; फलटण प्रकरणावर तानाजी सावंतांचा खुलासा

September 1, 2026
तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात

September 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास

August 29, 2026

Recent Posts

  • तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता
  • ‘प्रसाद कोंडे-देशमुख माझे OSD-PA नव्हते’; फलटण प्रकरणावर तानाजी सावंतांचा खुलासा
  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात
  • तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास
  • तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!