धाराशिव : शिंगोली येथील शांताई हॉटेलमध्ये मागील भांडणाच्या कारणावरून आठ जणांनी एका व्यक्तीला लाथाबुक्यांनी, कोयत्याने आणि बिअरच्या काचेच्या बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी राजकुमार अच्युत वाघमारे (वय 35 वर्षे, रा. शिंगोली, ता. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 20 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता शांताई हॉटेल शिंगोली शिवार धाराशिव येथे ही घटना घडली. आरोपी आनंद दयानंद वाघमारे, मनोज शाम शिंदे, अतिश आकाश शिंदे, अमित अनंत वाघमारे, तालीब महेबुब शेख, ऋषीकेश रवी रनशिंगारे, मुकेश उर्फ दादा शाम शिंदे (सर्व रा. शिंगोली, ता. धाराशिव) यांनी मागील भांडणाचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्यांनी तसेच कोयता व बिअरच्या काचेच्या बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केले.
या प्रकरणी फिर्यादीने आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 191(3), 190 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3), 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.