धाराशिव – धाराशिव शहरातील एका हॉटेल व्यावसायिकास जून २०२३ रोजी सायबर गुन्हेगारांनी तब्बल सहा लाख रुपयांचा गंडा घातला होता. 7 पैकी 5 लाख रुपये रक्कम परत मिळवण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहारातील एका हॉटेल व्यावसायिक यास सायबर भामट्यांनी आर्मी ऑफीसर असलृयाचे भासवून रुम बुक करण्याचे बहाण्यावरुन ऑनलाईन पैसे पाठवणे कामी आमची आर्मी ची प्रोसिजर वेगळी आहे असे सांगून एक पेटीएम ची लिंक सेंड केली व सदर लिंक वर जावून फिर्यादी यास बॅकेची माहिती टाकल्यावर आपले पैसे मिळतील असे सांगून बनावट लिंक दवारे सदर आरोपीतांने तब्बल 6,98,000₹ फिर्यादी यांचे खातेवरुन काढून ऑनलाईन फसवणूक केली.
या फसवणूक प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती पोनि बी. एस. वाकडकर हे करत असुन त्यांना तपासामध्ये तांत्रिक विश्लेषन मदती करीता सपोनि सचिन पंडीत, पोउपनि श्रीमती ए.आर. जाधव, पोलीस हवालदार/1272 गणेश.डी.जाधव, पोलीस अमंलदार/1680 शशीकांत हजारे, पोलीस अमंलदार/927 प्रकाश भोसले, पोलीस हवलदार 1777 अनिल भोसले यांनी तपासादरम्यान फिर्यादी यांची फसवणुक झालेल्या रक्कमपैकी 5,18,000₹ हे फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास अद्याप सुरु आहे.
सायबर पोलीस स्टेशन धाराशिव यांचे वतीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नये तसेच आपला खाते क्रमांक, ओटीपी किंवा इतर वैयक्तीक माहिती आनोळखी लिंक ओपन करु नये. क्रमांक. संशय वाटल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.