• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

के.टी. पाटील यांचा पुतळा न काढल्यास खंडपीठात याचिका दाखल करणार

admin by admin
June 18, 2024
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
के.टी. पाटील अनधिकृत पुतळा प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला आ. चौगुले यांचा ‘खो’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या प्रांगणात उभा करण्यात आलेला गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा येत्या तीन दिवसांत स्वतःहून काढून घ्यावा अन्यथा प्रशासनाच्या वतीने पुतळा काढण्याबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी अंतिम नोटीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दि. १० एप्रिल २०२४ रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास बजावली होती. परंतु पुढे कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यावर कोणत्या नेत्याचा राजकीय दबाव आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसात पुतळा न काढल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितले.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थांसाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनाधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूल विरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे धाव घेतली असता, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला देखील सुधीर पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.त्यानंतर देखील सुधीर पाटील यांनी प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच उभा केला असून, त्याचे अनावरण काही दिवसापूर्वी करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम धाराशिव लाइव्हने दिले होते.

शहरातील भोसले हायस्कुलच्या प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच शासनाच्या जागेत उभा करण्यात आलेला आहे. तसेच जागेबाबत महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली आहे.त्यामुळे अनाधिकृत तसेच अतिक्रमित इमारत पाडून पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या अर्जाची सत्य पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कोणाच्या परवानगीने पुतळा उभा केला ? याचा खुलासा येत्या २४ तासात करावा अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली होती. त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षाने थातुरमातुर खुलासा केला होता.त्यानंतर १५ दिवसांत स्वतःहून पुतळा काढून घ्यावा अशी अंतिम नोटीस दिनांक १० जानेवारी, २०२४ रोजी देण्यात आली होती. पण आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने हा पुतळा काढला नाही. त्यानंतर शेवटची अंतिम नोटीस दि. १० एप्रिल २०२४ रोजी देण्यात आली होती. ही मुदत देखील १५ एप्रिल रोजी संपली आहे. परंतु पुढे कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यावर राजकीय दबाव आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

खंडपीठात याचिका दाखल करणार – सुभेदार

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अंतिम नोटीस प्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिली नसताना पुढील कारवाई का करण्यात आली नाही ? तसेच सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

येत्या आठ दिवसात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पुतळा न काढल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितले.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात

Next Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!