• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

डेपो न हलवल्यास २८ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा युवा सेनेचा इशारा

admin by admin
April 17, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव शहरातील कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, डेपोतून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढून कचरा डेपो इतरत्र हलवावा, अन्यथा २८ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे. या मागणीचे निवेदन गुरुवारी युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

युवा सेनेचे शहरप्रमुख रवी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून गोळा केला जाणारा कचरा शहरालगतच्या डेपोमध्ये टाकला जातो. गेल्या काही महिन्यांपासून या कचरा डेपोतून सातत्याने धूर निघत असून तो परिसरातील लोकवस्तीत पसरत आहे. उमर मोहल्ला, ख्वाजानगर, गणेशनगर, दर्गाह रोड, तालीम गल्ली, बस डेपो परिसर, आयुर्वेद महाविद्यालय परिसर, अहिल्यादेवी होळकर चौक, आगड गल्ली या भागांतील नागरिकांना या धुराचा आणि दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या विषारी धुरामुळे अनेकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत, ज्यामुळे डोळ्यांचे व श्वसनाचे गंभीर विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.

या कचरा डेपोतील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी. जर हे शक्य नसेल, तर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा कचरा डेपो तातडीने शहराबाहेर इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या समस्येबाबत यापूर्वीही नागरिकांनी निवेदने दिली होती, मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

जर प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना केली नाही, तर २८ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर युवा सेनेचे शहरप्रमुख रवी वाघमारे यांच्यासह प्रवीण कोकाटे, प्रदीप मुंडे, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, पांडू भोसले, गणेश खोचरे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

उमरगा: शेतातील गहू पीक आणि साहित्याचे जाणीवपूर्वक नुकसान; एकावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये सेवानिवृत्त लिपिकाच्या जागेवर अतिक्रमण आणि फसवणूक

Next Post
धाराशिवमध्ये सेवानिवृत्त लिपिकाच्या जागेवर अतिक्रमण आणि फसवणूक

धाराशिवमध्ये सेवानिवृत्त लिपिकाच्या जागेवर अतिक्रमण आणि फसवणूक

ताज्या बातम्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

November 3, 2026
चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा
  • चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात
  • तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास
  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!