कळंब : फिर्यादी नामे-गणेश बाबुराव मडके, वय 37 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यांचे शेतातील अमृतुल्य बिअरबार परमीट रुमचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 05.02.2024 रोजी 23.30 ते दि. 06.02.2024 रोजी 07.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन गल्यात ठेवलेली रोख रक्कम 1,31,000₹, देशी विदेशी दारुच्या अंदाजे 21,185 ₹ किंमतीच्या सिलबंद बाटल्या एकुण 1,52,185₹, तसेच अशोक किसन गायकवाड यांचे राहाते घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटातील 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे 60,000₹, शिवाजी पंढरी मडके यांचे राहाते घराचे कुलूप तोडून घरातील डब्यामध्ये ठेवलेले सोन्याचे 4,40 ग्रॅम वजनाचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम 5,000 ₹ एकुण 42,996 ₹ असा एकुण 2,55,181 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश मडके यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे- अशोक भारत मुंडे, वय 36 वर्षे, रा. गोविंदपुर, ता. कळंब जि. धाराशिव यांचे कळंब येथील अभिराज ट्रेडर्स दुकानाचे अज्ञात व्यक्तीने दि.04.02.2024 रोजी 01.30 ते 02.00 वा. कुलूप तोडून आत प्रवेश करुन सोयाबीनचे 13 पोते व रोख रक्कम 4,000 ₹ असा एकुण 49,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक मुंडे यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- ज्योती शिवाजी देशपांडे, वय 58 वर्षे, रा. विकास नगर तेरणा कॉलेज जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि. 06.02.2024 रोजी 11.00 वा. सु. बसस्थान धाराशिव येथे धाराशिव ते तेर बसमध्ये चढत असताना ज्योती देशंपाडे यांचे गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट अंदाजे 45,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्योती देशपांडे यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे- श्रीधर बाबुराव गुंड, वय 67 वर्षे, रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव हे दि. 18.01.2024 रोजी 20.00 ते दि. 02.02.2024 रोजी 17.30 वा. सु. राजुरी येथील शेत गट नं 103 मधील राहाते घराला कुलूप लावून त्यांचे मुलाकडे गेले असता अज्ञात व्यक्तीने त्यांचे राहाते घराच्या शेडचा पत्रा उचकटून आत प्रवेश करुन शेडमधील सीसीटीव्ही कॅमेरा, बॅटरी, फवारणी पंप, सात नग ताडपत्री, डिझल कॅन्ड, लाईट बॅटरी, पेटी, साड्या 9 नग, गॅसची शिगडी, गॅस सिलेंडर, बकेट 3 नग, मोबाईल चार्जर, चांदीचे जोडवे असा एकुण 73,300 ₹ किंमतीचे शेततील अवजारे व संसार उपयोगी साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीधर गुंड यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.