धाराशिव – धाराशिव शहरात मिलन नाईट तर कळंबमध्ये कल्याण मटका जोरात सुरु आहे. पोलिसांनी धाराशिवमध्ये दोघांविरुद्ध आणि कळंबमध्ये एका विरुद्ध कारवाई केली आहे.
जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.27.11.2023 रोजी 19.30 ते 19.35 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)इरशाद इलाही तांबोळी, वय 40 वर्षे, रा झोरी गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवह सांजा रोड लगत धाराशिव येथे मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 370 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)मैनु मदार तांबोळी, वय 40 वर्षे, रा खिरणी मळा, धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.35 वा. सु. आरबीकलेक्शन समोर रोड लगत धाराशिव येथे मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2गुन्हे नोंदवले आहेत.
कळंबमध्ये कल्याण मटका
कळंब : जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.27.11.2023 रोजी 14.10 वा. सु. कळंब पो. ठा.आठवडी बाजार कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)पाशा दगडू शेख, वय 35 वर्षे, रा. चोंदे गल्ली कळंब ता.कळंब जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. आठवडी बाजार कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 630 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
अवैध मद्य विरोधी कारवाई
धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सुनिता दिपक लोखंडे, वय 40 वर्षे, रा. इंदीरानगर, धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.27.11.2023 रोजी 19.50 वा. सु. इंदीरानगर येथे अंदाजे 3,480 ₹ किंमतीची 58 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)रेणुका प्रशांत तेलंग, वय 23 वर्षे, रा. चिलवडी, ता. जि. धाराशिव या दि.27.11.2023 रोजी 18.30 वा. सु. चिलवडी झोपडपट्टी येथे अंदाजे 3,100 ₹ किंमतीची 50 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.