धाराशिव – महाराष्ट्र शासनाने धाराशिव आणि कळंब नगरपरिषदांसाठी विशेष अनुदान योजना अंतर्गत एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार धाराशिव नगरपरिषदेला ४ कोटी तर कळंब नगरपरिषदेला ६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
माजी आमदार ज्ञानराज चौगुले ,जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, अजित पिंगळे यांच्या प्रयत्नाने निधी हा निधी मंजूर झाला आहे.
धाराशिव नगरपरिषदेत विकासकामांची भर
धाराशिव नगरपरिषद क्षेत्रात सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम आणि काही ठिकाणी नाल्यांचे बांधकाम करण्यासाठी एकूण ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
धाराशिवमध्ये प्रमुख विकासकामे पुढीलप्रमाणे:
- जिजाऊ नगर: देशमुख ते निकम घर, घोळवे ते मुंडे घर, मोहन पाटील ते विष्णु कोळगे घर इ. रस्ते.
- दत्त नगर: घायाळ शिवाजी ते पंढरपूरकर, आहिरे ते भंडारे, भोसले मॅडम ते राम चंद्र आदमाने इ. रस्ते.
- राम नगर: मुनाळे ते चौघुले घर.
- गणेश नगर: मनोज जाधव ते अमोल लोहार, होळकर ते सचिन देशमुख घर इ.
- भानु नगर: बोचले ते कासार घर, मायभाटे ते देशमुख घर.
कळंब नगरपरिषदेत विकासाची नवी दिशा
कळंब नगरपरिषद क्षेत्रासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सभागृह बांधकाम, मंदिर परिसर लादीकरण, उद्यानांचे विकासकामे आणि खेळणी बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
कळंबमधील प्रमुख कामे:
- सभागृह बांधकाम: दक्षिण हनुमान मंदिर समोरील खुल्या जागेत.
- लादीकरण: सावरगाव (पु.) हनुमान मंदिर परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर.
- उद्यान विकास: पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आणि महिला उद्यानात व्यायामाचे साहित्य बसविणे.
- मंदिर परिसर विकास: संत रोहिदास महाराज मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर इ.
विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
धाराशिव आणि कळंब नगरपरिषदांना मंजूर झालेला हा निधी शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होऊन नागरीकांना सुविधा उपलब्ध होतील. शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.