धाराशिव जिल्हा प्रशासनाने अखेर कडक भूमिका घेतली आहे. नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात कुणीही अडथळा आणू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी यांनी कार्यालयाने दिला आहे.
“शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने लढा द्यावा – रस्ता रोखू नये!”
✔ धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आज या प्रकरणी बैठक झाली.
✔ बैठकीला बाधित शेतकरी, त्यांचे दलाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
✔ जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले – “मोजणीला आणि काम करायला कुणीही अडथळा आणू नये!”
“रस्ता बंद, लोकांचे हाल, अपघात वाढले – प्रशासन आता गप्प बसणार नाही!”
✔ रुग्णवाहिका अडतात, अपघात वाढले आहेत, लोकांना त्रास होतो आहे – त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त होणे आवश्यक आहे.
✔ चार पदरी महामार्ग रद्द करून, आता जुना रस्ता डांबरीकरण केला जात आहे, तरीही दलालांचा अडथळा सुरूच!
“धाराशिव लाइव्हचा दणका – दलालांची तक्रार आणि जिल्हाधिकाऱ्यांचे उत्तर!”
✔ बैठकीत उमरग्याच्या दलालाने धाराशिव लाइव्हच्या बातमीचा उल्लेख केला!
✔ “आम्हाला दलाल म्हटले जाते!” अशी तक्रार त्याने केली.
✔ यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं – “हा आमचा विषय नाही!”
✔ बाधित शेतकरी आणि दलाल तोंडावर आपटले – कारण आता जुन्या रस्त्यावरच डांबरीकरण सुरू आहे, मग अडथळा कशासाठी?
“रस्ता अडवणाऱ्या दलालांचा खेळ संपला!”
👉 जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा – रस्ता रोखला, तर कारवाई होणार!
👉 चार पदरी महामार्ग रद्द, मग आता विरोध कशासाठी?
👉 धाराशिव लाइव्हच्या बातमीचा दणका – दलालांचा पायाखालची वाळू सरकली!
“लोकांना विकास हवा आहे – दलालांना नाही!”
📢 रस्ता अडवणाऱ्या दलालांना प्रशासनाने वेळीच ठेचले पाहिजे!
📢 शेतकऱ्यांना गंडवून पैसे उकळणाऱ्या दलालांची चौकशी झाली पाहिजे!
📢 लोकांच्या हालअपेष्टा थांबवा – रस्ता मोकळा करा!
👉 धाराशिव लाइव्हचा आवाज हा लोकांचा आवाज आहे – आता अडथळे संपले पाहिजेत!