लोहारा :आरोपी नामे-सतिश किसन बिराजदार, रा. लोहारा बु. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.01.03.2024 रोजी 23.30 वा. सु. लोहारा येथे फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर सतिश बिराजदार, वय 32 वर्षे, रा. लोहारा बु ता. लोहारा जि. धाराशिव यांची आई जखमी नामे- अनुसया सतिश बिराजदार, वय 49 वर्षे, रा. लोहारा बु, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी नमुद आरोपीस दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचे कारणावरुन अनुसया बिराजदार ह्या झोपीत असताना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जात्याची पाळू घेवून डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर बिराजदार यांनी दि.03.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 307 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा :आरोपी नामे-1) संदीप प्रभु रसाळ, 2) गोपाळ मुर्टे, 3) शुभम व्यंकट रसाळ, 4)मंगेश विष्णु रसाळ, सर्व रा. लोहारा खु ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.02.03.2024 रोजी 21.00 वा. सु. जि.प.शाळा लोहारा खु येथे फिर्यादी नामे- सोमनाथ बालाजी मोदळे, वय 20 वर्षे, रा. लोहारा खु ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गॅदरींगचे कार्यक्रम पाहत असताना शिट्टी वाजविण्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीचा नातेवाईक हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सोमनाथ मोदळे यांनी दि.03.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149, भा.दं.वि.सं. सह 3 (2)(व्हि) अ.जा.ज.प्र.अ. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी :आरोपी नामे-1)सतीश सुब्राव भैरट, 2) राहुल सुनिल भैरट, रा. शेलगाव ता. वाशी जि. धाराशिव 3) पांडुंरंग संभाजी सातपुते रा. दहिफळ ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.02.03.2024 रोजी 19.30 ते 22.00 वा. सु. दहिफळ व शेलगाव शिवारातील हॉटेल राजधानी येथे फिर्यादी नामे- रंगनाथ बुवा सावंत, वय 60 वर्षे, रा. दहिफळ ता. वाशी जि. धाराशिव ह.मु. सिंहगड रोड वडगाव धायरी जि. पुणे यांना नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन दोरीने पाय बांधून लाथाबुक्यांनी, वायरने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली व खिशातील 30,000 रुपये काढून घेतले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे रंगनाथ सावंत यांनी दि.03.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 365, 327, 324, 323, 341, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. सह 3(1)(आर)(एस), 3(2)(5),3(2)(व्हिए) अ.जा.ज.प्र.अ. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी :आरोपी नामे-1)दत्तात्रय नागनाथ घायाळ, 2) बाळकृष्ण नागनाथ घायाळ, 3) राणी दत्तात्रय घायाळ सर्व रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 03.03.2024 रोजी 07.30 वा. सु. काटी येथे फिर्यादी नामे- केशव नागनाथ घायाळ, वय 33 वर्षे, रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना जमीनीचे वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे आई तोळणबाई घायाळ व वडील नागनाथ घायाळ यानांही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- केशव घायाळ यांनी दि.03.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. सह 3 (2)(व्हि) अ.जा.ज.प्र.अ. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.