• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: बांधाच्या वादातून माय-लेकाला कोयता, दांडक्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 10, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या आईला दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी कोयत्याने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील वरुडा येथे घडली. याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सचिन लिंबराज गाढवे (वय २४ वर्षे, रा. वरुडा, ता. जि. धाराशिव) यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी रात्री (पहाटे) दीड वाजण्याच्या सुमारास वरुडा गावामध्ये आरोपी अजित भुजंग गाढवे आणि मुद्रुका भुजंग गाढवे (दोघे रा. वरुडा) यांनी सचिन गाढवे व त्यांच्या आईला अडवले.

‘शेताचा बांध का टोकरला?’ या कारणावरून आरोपींनी सचिन आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी लोखंडी कोयता आणि लाकडी दांडक्याने दोघांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या हल्ल्यानंतर सचिन गाढवे यांनी दि. ९ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजित गाढवे आणि मुद्रुका गाढवे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११८(१), ११५(२), २९६, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शेतीच्या किरकोळ वादातून झालेल्या या गंभीर मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

कळंब: ‘आमच्यावर केस का केली?’ विचारत शेतकऱ्याला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

तुळजापूर: किरकोळ वादातून तरुणावर चाकू हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

तुळजापूर: किरकोळ वादातून तरुणावर चाकू हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026

Recent Posts

  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!