• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बोगस गुंठेवारी प्रकरणी अखेर तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव लाइव्हचा दणका

admin by admin
December 3, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर नगर पालिकेतील बोगस गुंठेवारी प्रकरणी अखेर चार दोषी कर्मचाऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांचा समावेश आहे.

धाराशिव नगर पालिकेतील बोगस गुंठेवारी प्रकरणी चार दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास मुख्याधिकारी वसुधा फड या टाळाटाळ करीत असल्याने या प्रकरणी त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.या नोटीसीला मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केराची टोपली दाखवत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. याबाबतचे वृत्त धाराशिव लाइव्हने २९ नोव्हेंबर रोजी दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसीला न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दाखवली केराची टोपली

धाराशिव पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी बजावली चार जणांना कारणे दाखवा नोटीस

धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर धाराशिव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी बोगस गुंठेवारी प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्याधिकारी फड यांनी पडताळणी समितीतील चार जणांना कारणे नोटीसा बजावल्या होत्या., २४ तासात खुलासा करा अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जा, अशी तंबी दिली होती. याबाबतचे वृत्त धाराशिव लाइव्हने २९ नोव्हेंबर रोजी दिले होते.

अखेर गुन्हा दाखल

धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर नगर पालिकेतील बोगस गुंठेवारी प्रकरणी अखेर चार दोषी कर्मचाऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांचा समावेश आहे.

नगर पालिकेचे रचना सहाय्यक मनोज कलुरे यांनी फिर्याद दिली असून, भादंवि १६६, ४०९ , ३४ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आनंदनगर पोलिसांकडे न देता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणी आहे.

निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे आत्यांच्यावर आजवर ८ गुन्हे दाखल असून, आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात एकूण १३१४ गुंठेवारी फाईल्स मंजूर झाल्या असून पैकी १३४ बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी करून लेआऊट मंजूर करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकरणात भूखंडाचे सर्व्हे मधील स्थान दर्शवणारा मोजणी नकाशा नसल्याने व काही प्रस्तावामध्ये कच्चा रेखांकन नकाशा नसल्याने मंजूर विकास योजनेमध्ये प्रस्तावाअंतर्गत भूखंडाचे निश्चित होत नाही. तसेच काही संचिकांमध्ये मूळ मालक यांच्याकडील क्षेत्रामध्ये १० टक्के जागेचे क्षेत्र हस्तांतरित न करता गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.

तसेच रद्द केलेल्या रेखांकन प्रस्तावास मंजुरी देणे, बांधकामाचे विकास शुल्क न आकारणे, मूळ मालकाचे नावे गुंठेवारी करणे, खरेदीदार व्यक्तिरिक्त इतरांचे नावे गुंठेवारी करणे, भोगवटदार वर्ग २ चे जमिनीचे विभाजन करून गुंठेवारी करणे, बेकायदेशीर बांधकाम नियमित करणे, बांधकामाचे अधिमूल्य न आकारणे, विकास शुल्कात ५० टक्के सवलत देणे आदी गैरव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच गुंठेवारी नियमाधिन केलेल्या परवानगीची प्रत जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास पाठवण्यात आली नाही. काही प्रस्तावात ५० टक्के सूट देण्यात आली असली तरी उर्वरित रक्कम देखील नगर पालिकेत जमा झाली नाही.

या गैरव्यवहार प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी वसुधा फड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांचा समावेश आहे. सात दिवसाच्या आत खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली होती. भादंवि १८६० चे कलम १६६, ४०९ प्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा का दाखल करू नये ? अशी विचारणा देखील करण्यात आली होती.

त्यानंतर धाराशिव नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात झालेल्या बेकायदेशीर आणि चुकीच्या गुंठेवारी प्रकरणी संचिकेची पडताळणी करण्यासाठी दहा जणांना नियुक्त करण्यात आली आहे. त्यात ज्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यालाच नियुक्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत धाराशिव लाइव्हने दणका देताच, ठपका ठेवण्यात आलेल्या गोरोबा आवचार यांची या पडताळणी समितीतून हकालपट्टी करण्यात आली.

बोगस गुंठेवारी प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी शहरातील सर्व गुंठेवारी रद्द करावी, खरे सूत्रधार शोधून काढावेत, अशी मागणी आहे.

 

Previous Post

धाराशिव : कोरोना काळात बोगस बिल तयार करून एक कोटी हडप

Next Post

धाराशिवमध्ये दोन अपघातात दोन ठार

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये दोन अपघातात दोन ठार

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!