• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस

बोगस गुंठेवारी प्रकरणी चार दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास मुख्याधिकारी वसुधा फड यांची टाळाटाळ

admin by admin
November 20, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा
0
SHARES
259
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील बोगस गुंठेवारी प्रकरणी चार दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास मुख्याधिकारी वसुधा फड या टाळाटाळ करीत असल्याने या प्रकरणी त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीआहे.

नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात एकूण १३१४ गुंठेवारी फाईल्स मंजूर झाल्या असून पैकी १३४ बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी करून लेआऊट मंजूर करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकरणात भूखंडाचे सर्व्हे मधील स्थान दर्शवणारा मोजणी नकाशा नसल्याने व काही प्रस्तावामध्ये कच्चा रेखांकन नकाशा नसल्याने मंजूर विकास योजनेमध्ये प्रस्तावाअंतर्गत भूखंडाचे निश्चित होत नाही. तसेच काही संचिकांमध्ये मूळ मालक यांच्याकडील क्षेत्रामध्ये १० टक्के जागेचे क्षेत्र हस्तांतरित न करता गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.

तसेच रद्द केलेल्या रेखांकन प्रस्तावास मंजुरी देणे, बांधकामाचे विकास शुल्क न आकारणे, मूळ मालकाचे नावे गुंठेवारी करणे, खरेदीदार व्यक्तिरिक्त इतरांचे नावे गुंठेवारी करणे, भोगवटदार वर्ग २ चे जमिनीचे विभाजन करून गुंठेवारी करणे, बेकायदेशीर बांधकाम नियमित करणे, बांधकामाचे अधिमूल्य न आकारणे, विकास शुल्कात ५० टक्के सवलत देणे आदी गैरव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच गुंठेवारी नियमाधिन केलेल्या परवानगीची प्रत जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास पाठवण्यात आली नाही. काही प्रस्तावात ५० टक्के सूट देण्यात आली असली तरी उर्वरित रक्कम देखील नगर पालिकेत जमा झाली नाही.

या गैरव्यवहार प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी वसुधा फड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांचा समावेश आहे. सात दिवसाच्या आत खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली होती. भादंवि १८६० चे कलम १६६, ४०९ प्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा का दाखल करू नये ? अशी विचारणा देखील करण्यात आली होती.

त्यानंतर धाराशिव नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात झालेल्या बेकायदेशीर आणि चुकीच्या गुंठेवारी प्रकरणी संचिकेची पडताळणी करण्यासाठी दहा जणांना नियुक्त करण्यात आली आहे. त्यात ज्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यालाच नियुक्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत धाराशिव लाइव्हने दणका देताच, ठपका ठेवण्यात आलेल्या गोरोबा आवचार यांची या पडताळणी समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

या गुंठेवारी प्रकरणी चारही दोषी कर्मचाऱ्याविरुद्ध मुख्याधिकारी वसुधा फड या गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करावे, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसाच्या आत आपला स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

 

 

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात दोन मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

Next Post

भूम : जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
भूम : जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

भूम : जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : तब्बल ९८ किलो गांजा वाहतूक प्रकरण: ३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या ‘त्या’ दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

March 5, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

 तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ‘खाकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी; गुन्हेगारीच्या विळख्यात कायदा-सुव्यवस्था!

March 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: एकाच दिवशी चोरीचे ४ गुन्हे दाखल

March 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group