• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पालिकेचा अजब कारभार: स्वतःचा जेसीबी धूळ खात, भाड्याच्या जेसीबीतून मात्र ‘मलिदा’ खात!

admin by admin
June 25, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव पालिकेचा अजब कारभार: स्वतःचा जेसीबी धूळ खात, भाड्याच्या जेसीबीतून मात्र ‘मलिदा’ खात!
0
SHARES
284
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: “आपला माल पडीक, पण भाड्याच्या मालावर अधिकारी फिदा,” अशाच काहीशा अजब कारभाराचा नमुना धाराशिव शहरात पाहायला मिळत आहे. नगर पालिकेच्या मालकीचा जेसीबी (JCB) दुरुस्तीअभावी धूळ खात पडून आहे आणि त्याचे पार्टही चोरीला जात आहेत. मात्र, दुसरीकडे शहरातील कामांसाठी पालिका प्रशासन हजारो रुपये मोजून भाड्याने जेसीबी लावत आहे. या भाड्याच्या व्यवहारातूनच ‘अर्थ’पूर्ण लागेबांधे जपले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

शहरातील सांजा रोडवर असलेल्या अग्निशामक दलाच्या आवारात पालिकेचा जेसीबी गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. एकाच जागी पडून असल्याने चोरट्यांनी त्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून, एकेक पार्ट चोरून नेला जात आहे. काही दिवसांनी या गाडीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिल्यास आश्चर्य वाटायला नको. आपल्या मालकीच्या मालमत्तेची ही दुर्दशा होत असताना प्रशासनाला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नाही.

विशेष म्हणजे, शहरात जेव्हा जेव्हा अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली जाते किंवा पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम निघते, तेव्हा पालिकेला जेसीबीची गरज भासते. अशावेळी, स्वतःच्या मालकीचा जेसीबी दुरुस्त करून वापरण्याऐवजी, पालिका अधिकारी सरळ भाड्याने जेसीबी घेण्याचा सपाटा लावतात. यासाठी हजारो रुपयांची बिले काढली जातात आणि ती तात्काळ मंजूरही होतात.

याच प्रक्रियेत भ्रष्टाचाराची मुळे दडल्याचा आरोप होत आहे. स्वतःचा जेसीबी दुरुस्त केल्यास तो खर्च एकदाच होईल, पण भाड्याने जेसीबी लावल्यास प्रत्येक वेळी बिल काढता येते आणि त्यातून अधिकाऱ्यांना आपले ‘कमिशन’ सहज मिळवता येते. जनतेच्या पैशातून चालणाऱ्या या ‘कमिशनच्या खेळा’मुळे पालिकेचे दुहेरी नुकसान होत आहे. एकीकडे हक्काची मालमत्ता भंगारात जात आहे, तर दुसरीकडे भाड्याच्या नावाखाली तिजोरी रिकामी होत आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुख्य मुद्दे:

  • पालिकेचा हक्काचा जेसीबी सांजा रोडवर पडून भंगारात; पार्टची सर्रास चोरी.
  • अतिक्रमण आणि नालेसफाईसाठी भाड्याने जेसीबी आणून जनतेच्या पैशांची उधळपट्टी.
  • दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भाड्याच्या बिलातून कमिशन खाण्याचा डाव असल्याचा संशय.
Previous Post

धाराशिवमध्ये रुग्णालयावर जमावाचा हल्ला; डॉक्टर दांपत्याला मारहाण, वाहनांची तोडफोड

Next Post

धाराशिवमध्ये भीषण अपघात: भरधाव कारच्या धडकेत नगरपरिषद महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

Next Post
धाराशिवमध्ये भीषण अपघात: भरधाव कारच्या धडकेत नगरपरिषद महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

धाराशिवमध्ये भीषण अपघात: भरधाव कारच्या धडकेत नगरपरिषद महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group