धाराशिव – धाराशिव नगर पालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर धाराशिव शहरात सात, भोकरमध्ये एक आणि माजलगावमध्ये दोन असे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. येलगट्टे यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भष्ट्राचार करून करोडो रुपयाची बेनामी संपत्ती गोळा केली आहे. त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून, याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे केली आहे.
धाराशिव नगरपालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत. पैकी चार गुन्हे दखलपात्र आहेत. पाचव्या गुन्ह्यात १० दिवस पोलीस कस्टडी आणि १४ दिवस जेल भोगल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती, पण सहाव्या गुन्ह्यात पुन्हा अटक झाली , सहाव्या गुन्ह्यात जामीन झाला असला तरी २७ कोटीच्या सातव्या गुन्ह्यात त्यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सध्या ते धाराशिव कारागृहात बंधिस्त आहेत.मागील चार महिन्यापासून ते जेलची हवा खात असताना येलगट्टे यांच्यावर आणखी एक म्हणजे आठवा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
येलगट्टे यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भष्ट्राचार करून करोडो रुपयाची संपत्ती गोळा केली आहे.पुण्यात चार फ्लॅट, फलटण, कोकणात करोडो रुपयाची जमीन खरेदी केल्याची माहिती आहे. पुण्यात एका मेडिकल दुकानदारासोबत येलगट्टे यांची पार्टनरशिप असल्याची चर्चा सुरु आहे.
माहिती देण्यास नकार
येलगट्टे यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भष्ट्राचार करून करोडो रुपयाची बेनामी संपत्ती गोळा केली आहे. त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून, याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे का ? अशी माहिती विचारली असता, पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, याप्रकरणी आ. धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.