धाराशिव : आरोपी नामे-शेहबाज विक्रम शेख, दौलत विक्रम शेख, कादर आल्ताफ शेख सर्व रा. अंबेहोळ ता. जि. धाराशिव यांनी दि. 16.06.2024 रोजी सायंकाळी 07.00 वा. सु. अंबेहोळ येथे फिर्यादी नामे- समीर लतीफ शेख, वय 29 वर्षे, रा. अंबेहोळ ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु सारखेच आमच्या आई वडील व मामा सोबत भांडण तक्रारी का करतोस तुला माज आला का असे म्हाणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने पायाचे नडगीवर, पाठीवर हातावर मरहाण करुन हात फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- समीर शेख यांनी दि.20.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : आरोपी नामे-वैभव बंकट कवठे, सचिन विलास नांगरे, रा. नळवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 20.06.2024 रोजी 16.30 वा. सु. येणेगुर शिवार मुरुम मोड महालिंगराया मंगल कार्यालया जवळ फिर्यादी नामे- समर्थ उर्फ गणेश महेश पाटील, वय 19 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- समर्थ पाटील यांनी दि.20.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल
कळंब : कळंब पोलीस ठाण्याचे पथक कळंब पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दि.15.06.2024 रोजी 19.50 ते दि. 17.05.2024 रोजी 23.30 वा. सु. कब्रस्थान कळंब व कळंब शहारातील मांजरा नदीच्या काठी मज्जीदच्या पाठीमागे अज्ञात व्यक्तींनी चार गोवंशीय जातीच्या जर्शी गाय, दोन बैल, असे एकुण 78,000 ₹ किंमतीचे कत्तलखान्यामध्ये अवैधरित्या कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5,5(ब), 9, 11 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.