धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार नेहा काकडे यांनी विजयाची मोहोर उमटवली आहे.
नगराध्यक्षपदाची लढत:
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेहा काकडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत तब्बल २६०० मतांच्या मताधिक्याने विजय संपादन केला. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या परवीन कुरेशी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या, तर शिवसेना (ठाकरे गट) च्या उमेदवार संगीता गुरव यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
नगरसेवक पदाची आकडेवारी:
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही भाजपने आघाडी घेतली असून, एकूण ४१ जागांपैकी २२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. पक्षनिहाय बलाबल खालीलप्रमाणे आहे:
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | २२ |
| शिवसेना (ठाकरे गट) + काँग्रेस ( ७ +३ ) | १० |
| राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) | ०८ |
| एमआयएम (MIM) | ०१ |
| एकूण जागा | ४१ |
या निकालामुळे धाराशिव नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली असून, कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला आहे. विरोधी पक्षात शिवसेना (ठाकरे गट) ७ , काँग्रेस ३ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना ८ जागांवर यश मिळाले आहे, तर एमआयएमला केवळ एका जागेवर खाते उघडता आले.शिवसेना शिंदे गटाला भोपळा मिळाला आहे. २१ जागा लढवून एकही जागा जिंकता आली नाही. शिंदे गटाचे नेते सुधीर पाटील यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका प्रेमाताई पाटील यांना देखील पराभवाची धूळ चाखावी लागली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस आय आघाडीचे विजयी उमेदवार:
१ अ — अक्षय लक्ष्मण जोगदंड
३ ब — सचिन उर्फ राजाभाऊ पवार
५ ब — सोनाली अमित उंबरे
९ ब — संतोष उर्फ नाना घाटगे
८ ब — प्रदीप प्रभाकर मुंडे
१९ ब — सौ. सोनाली रविंद्र वाघमारे
१९ क — सौ. ज्ञानेश्वरी अजित (राज) निकम
१५ ब — सौ. केशरबाई ज्ञानदेव करवर
१५ अ — सिद्धार्थ अंगुल बनसोडे
१८ अ — पठाण उज्मासबा अजहरखान






