• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषदेवर भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी नेहा काकडे यांची निवड

admin by admin
December 21, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव नगर परिषदेवर भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी नेहा काकडे यांची निवड
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार नेहा काकडे यांनी विजयाची मोहोर उमटवली आहे.

नगराध्यक्षपदाची लढत:

नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेहा काकडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत तब्बल २६०० मतांच्या मताधिक्याने विजय संपादन केला. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या परवीन कुरेशी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या, तर शिवसेना (ठाकरे गट) च्या उमेदवार संगीता गुरव यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नगरसेवक पदाची आकडेवारी:

नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही भाजपने आघाडी घेतली असून, एकूण ४१ जागांपैकी २२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. पक्षनिहाय बलाबल खालीलप्रमाणे आहे:

पक्षाचे नाव जिंकलेल्या जागा
भारतीय जनता पक्ष (BJP) २२
शिवसेना (ठाकरे गट) + काँग्रेस  ( ७ +३ ) १०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ०८
एमआयएम (MIM) ०१
एकूण जागा ४१

या निकालामुळे धाराशिव नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली असून, कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला आहे. विरोधी पक्षात शिवसेना (ठाकरे गट) ७  , काँग्रेस ३ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना  ८ जागांवर यश मिळाले आहे, तर एमआयएमला केवळ एका जागेवर खाते उघडता आले.शिवसेना शिंदे गटाला भोपळा मिळाला आहे. २१ जागा लढवून एकही जागा जिंकता आली नाही. शिंदे गटाचे नेते सुधीर पाटील यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका प्रेमाताई पाटील यांना देखील पराभवाची धूळ चाखावी लागली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस आय आघाडीचे विजयी उमेदवार:
१ अ — अक्षय लक्ष्मण जोगदंड
३ ब — सचिन उर्फ राजाभाऊ पवार
५ ब — सोनाली अमित उंबरे
९ ब — संतोष उर्फ नाना घाटगे
८ ब — प्रदीप प्रभाकर मुंडे
१९ ब — सौ. सोनाली रविंद्र वाघमारे
१९ क — सौ. ज्ञानेश्वरी अजित (राज) निकम
१५ ब — सौ. केशरबाई ज्ञानदेव करवर
१५ अ — सिद्धार्थ अंगुल बनसोडे
१८ अ — पठाण उज्मासबा अजहरखान

Previous Post

धाराशिव जिल्हा नगरपरिषद निवडणूक २०२५: भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची बाजी

Next Post

तुळजापूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा; विनोद गंगणे यांची नगराध्यक्षपदी निवड

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपी विनोद गंगणेला भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी

तुळजापूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा; विनोद गंगणे यांची नगराध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!