• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 4, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लॉजवर वेश्या व्यवसाय : नितीन शेरखाने याची जेलमध्ये रवानगी

admin by admin
December 26, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : वेश्या व्यवसाय प्रकरणी नितीन शेरखाने गजाआड
0
SHARES
2.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज मध्ये मागील अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानंतर दि. २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी या लॉजवर छापा मारला असता, चार महिलांसह काही ग्राहक मिळून आले होते.

याप्रकरणी लॉजमालक नितीन शेरखाने यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेरखाने फरार झाला होता. पोलिसांनी अखेर शेरखाने याच्या रविवारी पहाटे मुसक्या आवळल्या होत्या. त्यास सुट्टीच्या कोर्टात उभे करण्यात आले असता, तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. तीन दिवसाची पोलीस कस्टडी संपताच, आज पुन्हा कोर्टात उभे करण्यात आले असता, जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

नितीन शेरखाने हा शिवसेना ( उबाठा ) सेनेचा पदाधिकरी असून,  राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे.त्याची पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या.  त्यांच्यावर वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज येथे मागील अनेक दिवसापासून राजरोस वेश्या सुरु होता. धाराशिव ग्रामीण पोलीस  आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दरमहा हप्ता सुरु होता. हा प्रकार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कानावर जाताच, त्यांनी एक पथक नेमून सदर लॉजवर छापा मारला असता चार महिला सापडल्या. याप्रकरणी लॉजमलक नितीन शेरखाने यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पोलीस पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर दि. 21.12.2023 रोजी 16.05 वा. सु. छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव,दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक 1)नितीन रोहीदास शेरखाने रा. धाराशिव यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले.

यावरुन पथकाने लॉज मॅनेजर नामे- 1) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-2) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची पाकीटे असा एकुण 71,130 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन लॉजमालक नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं 352/2023 भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 21.12.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीन शेरखाने फरार झाला होता. पोलिसांनी रविवारी पहाटे त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

अटकेनंतर ग्रामीण पोलिसांनी त्यास सुट्टीच्या कोर्टात उभे केले असता, तीन दिवसाची म्हणजे २६ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. तीन दिवसाची पोलीस कस्टडी संपताच, आज पुन्हा कोर्टात उभे करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर नितीन शेरखाने याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

धाराशिव शहरात आणखी काही लॉजवर राजरोस वेश्या व्यवसाय सुरू आहे. शहर आणि आनंदनगर पोलीस, धाराशिव ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हप्ता घेऊन मूग गिळून गप्प आहेत.हप्ता नाही मिळाला की, छापा मारला जातो नाही तर ‘तेरी भी चूप , मेरी भी चूप असा प्रकार सुरु आहे.

Previous Post

ढोकी आणि आंबी येथे चोरीची घटना

Next Post

परजिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यात दरोडा टाकण्यासाठी आलेले आठ दरोडेखोर जेरबंद

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

परजिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यात दरोडा टाकण्यासाठी आलेले आठ दरोडेखोर जेरबंद

ताज्या बातम्या

वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

उंबरठा उत्पन्नाची अट रद्द करा, अन्यथा एकाही शेतकऱ्याला पीक विमा भरपाई मिळणार नाही

July 4, 2025
वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

July 4, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लोहारा तालुक्यातील तोरंब्यात घरफोडी; दागिने, साडीसह तांदूळ-तेलही केले लंपास, गावातीलच तिघांवर गुन्हा

July 4, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरग्यातील वरनाळवाडीत शेतकरी हवालदिल; रात्रीतून २.३० लाखांच्या ४० शेळ्या चोरीला

July 4, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरग्यातील कोथळीत धाडसी घरफोडी; दीड लाखांचे दागिने लंपास

July 4, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group