धाराशिव – ऐन नवरात्रात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची ‘बोगस नॉन-क्रीमिलेयर’ प्रकरणामुळे मोठी डोकेदुखी झाली आहे. प्रकरणाचे जन्मदाता, सत्यशोधक व माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार, यांचे नाव ऐकताच साहेबांना गरगरायला लागले. साहेबांच्या डोकेदुखीची तडफड बघून दोन चाटू पत्रकारांच्या डोळ्यात पाणी तरळले. मग, झोप नाही म्हणून दोघांनी थेट पेगपान करण्याचा निर्णय घेतला!
रेस्ट हाऊसमध्ये इलेक्शन ड्यूटीवर असलेल्या साहेबांसोबत पसरलेल्या पेगच्या आसवांतून, चाटू पत्रकारांना एक क्रांतिकारी विचार सुचला – “सुभेदारांच्या विरुद्ध निवेदन द्यायचं!” पण अडचण अशी, की निवेदनावर सुभेदार यांचे नाव ऐकताच, बाकी अधिकारी, कर्मचारी यांनी निवेदनावर सहीच करायला नकार दिला. शेवटी, नाव वगळून एक निवेदन जन्मास आलं, ज्यात फक्त “बदनामी करणाऱ्यांचा निषेध” असं अस्पष्ट लिहिण्यात आलं.
तरीही पापनगरी आणि बियर बार फेम स्वार्थी पत्रकाराने निवेदनाच्या ‘मनाचे शब्द’ भरत, “बदनामी करणाऱ्यावर कडक कारवाई करा” अशी फेकन्यूज लिहून सुभेदारांची धमकीच दिली. त्यावर सुभेदारांनी ओपन चॅलेंज दिलं – “कारवाई करा असं कुठे लिहिलंय, ते दाखवा!” थेट राज्यपालांना निवेदन देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि खोटं ठरल्यास स्वतःला फाशी द्यायची घोषणाही सुभेदारांनी दिली.
संपूर्ण प्रकरणात पत्रकारांच्या ‘हवेतील बुडबुडे’ वृत्तीवर सुभेदारांचा घणाघाती बाण लागल्याने त्यांचे ‘मनाचे शब्द’ गुदमरले. खरी माहिती मिळवण्यासाठी सुभेदार जरी माहिती अधिकाराच्या कागदोपत्री तळाशी शिरले असले तरी चाटू पत्रकार अजूनही आपल्या निवेदनात हवा भरत, साहेबांचे ‘डोकेदुखी संपवण्याचा’ मार्ग शोधतायत!
आता पहा, सुभेदार यांचे हे सत्यनिष्ठ आव्हान ओम्बासे साहेब कसे घेणार? आणि चाटू पत्रकारांच्या ‘पेग’पेक्षा मोठी बुडबुडी मथळ्यातून कशी वाहणार, याची धाराशिवकरांना उत्सुकता!






