धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केला आहे. तशी तक्रार केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे दाखल आहे.
दरम्यान, डॉ. ओंम्बासे यांनी माझे वडील प्राध्यापक होते, पण आई गृहिणी आहेत. वडील सन २०१२-१३ मध्ये सेवानिवृत्त झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर काही महसूल कर्मचाऱ्यांनी सुभेदार यांच्या दाव्याचा निषेध केला.
त्यावर सुभेदार यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे निवेदन देऊन, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा पुन्हा केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच तक्रार खोटी निघाल्यास आपल्याला फाशी द्यावी, असे जाहीर केले.
हे प्रकरण आता खूपच तापले असून, यात दोन चाटू पत्रकारांनी सुभेदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करता येईल का, याची चाचपणी केली. पण अजून तरी तक्रार द्यायला कुणी पुढे आले नाही.
तसेच, महसूल कर्मचाऱ्यांच्या यांच्या निवेदनात फक्त निषेध करण्यात आला असताना, या दोन चाटू पत्रकारानी सुभेदार यांचे नाव न घेता बदनामी करणाऱ्यावर कडक कारवाई करा, अशी खोटी बातमी पसरवली आहे.
सुभेदार यांची लोकसेवा आयोगाकडे केलेली तक्रार पाहा