उमरगा : आरोपी नामे-अजय जर्नादन बिराजदार, वय 26 वर्षे, रा. वागदरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 04.07.2024 रोजी 19.15 वा. सु. तुरोरी गावाचे पुढे उड्डाणपुला जवळ पिकअप क्रमांक एमएच 25ए.जे. 2413 या वाहनामध्ये वर.न. वर्णनाचे व किंमतीचे वाळु चोरी करुन चोरटा विक्री व्यवसाय उद्देशाने वाहतुक करीत असताना उमरगा पोलीसांना मिळून आला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी दत्तात्रय कामतकर, वय 51 वर्षे, नेमणुक उमरगा पोलीस ठाणे यांनी दि.05.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- यशवंत लक्ष्मणराव मोहिते, वय 61 वर्षे, रा. शाहुनगर काकडे प्लॉट धाराशिव ता. जि. धाराशिव यांची 30,000₹ किंमतीची होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची ॲक्टीव्हा स्कुटी क्र एमएच 25 ए.ई. 0347 ही दि. 29.06.2024 रोजी 11.00 ते 17.30 वा. सु. शरद पवार शाळा समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या यशवंत मोहिते यांनी दि.05.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-प्रताप ज्ञानदेवराव कवडे, वय 69 वर्षे, रा. समर्थनगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे दि. 05.07.2024 रोजी 15.00 वा. सु. बसस्थानक येरमाळा येथे हैद्राबाद ते भुम बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून प्रताप कवडे यांच्या पॅन्टचे पाठीमागील खिशातील 16,500₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रताप कवडे यांनी दि.05.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : दि.04.07.2024 रोजी 00.10 ते 03.00 वा. सु. येशवंडी शिवारातील, घाटनांदुरी शिवारातील पवन चक्की चे टॉवर क्र 348 व टावर क्र 381 चे अनोळखी 4 व्यक्तीने फोरजी कॉपरकेबल30 मिटर, फायुजी कॉपरकेबल 60 मिटर,युपीएस, ट्रान्सफार्मर, कॉपर 100 मिटर लांबीचा, बसबार असा एकुण 53,100₹ किंमतीचा माल चोरुन नेला. व इतर मालाची तोडफोड करुन ऑईल सांडून नासधुस केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-देवीदास अप्पाराव कासार, वय 36 वर्षे, व्यवसाय रिनिव पावर सिक्युरिटी गार्ड क्यु.आर.टी. घाटनांदुर शिवार ह.मु. ईजोरा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.05.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 303(2),324(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
तुळजापूर : आरोपी नामे-बालाजी नामदेव गायकवाड, विशाल जाधव, व इरत दोन इसम यांनी दि. 05.07.2024 रोजी 01.00 वा. सु. सोलापूर ते धुळे जाणारे हायवे रोडचे ब्रिज जवळ सिंदफळ येथे फिर्यादी नामे- संदीप सुखदेव घाटशिळे, वय 28 वर्षे, हे मोटरसायकलवर जात असताना नमुद आरोपींनी त्यांची मोटरसायकल आडवून मागील भाडंणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळई, वेळुची काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संदीप घाटशिळे यांनी दि.05.07.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन तुळजापूर पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 126, 118(1), 115(2), 352, 351 (2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.