उमरगा : आरोपी नामे-1) अंकीता भ्र गितेश कुलकर्णी, वय 32 वर्षे, रा. उमरगा ह.मु. हडपसर पुणे, 2) संजय पिता दिगंबर कळमणकर, वय 62 3) अश्वीनी भ्र संजय कळमणकर, वय 58 वर्षे, 4) निकीता संजय कळमणकर, वय 28 वर्षे, 5) अदित्य संजय कळमणकर, वय 26 वर्षे, 6) देविदास खंडेराव पाटील, वय 64 वर्षे, रा. कलबुर्गी कर्नाटक यांनी दि. 15.01.2014 ते दि. 07.06.20154 या कालावधीत उमरगा व गुलबर्गा येथे फिर्यादी नामे- गितेश पिता उमाकांतराव कुलकर्णी, वय 35 वर्षे, रा. चावडी गल्ली उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे पत्नी अंकीता गितेश कुलकर्णी यांचे पहिले लग्न झाल्याचे माहित असताना तिचे कसले अफयेर झाले नसल्याचे खोटे सांगून व फिर्यादी यास सदरची माहिती न देता ती जाणीवपुर्वक लपवून ठेवून नमुद आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीची फसवणुक केली. वगैरे बाबतची मा. जेएमएफसी कोर्ट उमरगा यांचे जा.क्र 395/24 दि. 15.02.2024 अन्व्ये एम.केस वरुन फिर्यादी नामे-गितेश कुलकर्णी यांनी दि.17.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 420, 120 ब, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नवऱ्याच्या त्रासास कंटाळून बायकोची आत्महत्या
मुरुम : मयत नामे-तेजल श्रीराम राठोड, वय 26 वर्षे, रा. अंबरनगर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.16.02.2024 रोजी 12.30 वा. सु. अंबरनगर तांडा मुरुम येथे गोचीड मारण्याचे औषध पिवून आत्महत्या केली. आरोपी नामे-श्रीराम भिमा राठोड, वय 30 वर्षे, (पती) रा. अंबरनगर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी मयत तेजल राठोड हीस सतत दारु पिवून मोल मजुरी करुन पैसे घेवून ये असे म्हणून शिवीगाळ व माहराण करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने नमुद आरोपींच्या जाचास व त्रासास कंटाळून तेजल राठोड यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रुपचंद सखाराम पवार, वय 21 वर्षे, रा. नांदुर्गा तांडा ता. औसा जि. लातुर यांनी दि.17.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 498(अ), 323, 504, 306 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.