• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

डिजिटल राक्षसाचा फास! धाराशिवमध्ये ऑनलाइन गेमने गिळले दोन संसार; एकाचा अंत, दुसरा देशोधडीला.

admin by admin
June 18, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
डिजिटल राक्षसाचा फास! धाराशिवमध्ये ऑनलाइन गेमने गिळले दोन संसार; एकाचा अंत, दुसरा देशोधडीला.
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: स्मार्टफोनच्या स्क्रीनवर चमकणारे आकडे… आणि त्या आकड्यांच्या मागे धावणारी ग्रामीण तरुणाई. एका क्लिकवर नशीब आजमावण्याचा हा खेळ आता जीवावर बेततोय. याला कुणी ‘काळ-पांढरं’ म्हणतंय, कुणी ऑनलाइन रमी. पण नाव काहीही असो, धाराशिव जिल्ह्यात या डिजिटल राक्षसाने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. एका हसत्याखेळत्या कुटुंबाला मृत्यूच्या खाईत लोटून आणि दुसऱ्या तरुणाला लाखोंचा गंडा घालून, या व्यसनाने ग्रामीण भागातील भीषण वास्तव समोर आणले आहे.

एका कुटुंबाची राखरांगोळी…

बावी गावचा लक्ष्मण जाधव… तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह करून संसार थाटलेला एक सामान्य तरुण. ट्रॅक्टर चालवून घर चालवणारे त्याचे हात कधी पत्त्यांच्या डिजिटल दुनियेत अडकले, हे त्यालाही कळलं नाही. ‘काळ-पांढरं’ नावाच्या या ऑनलाइन रमीच्या खेळाने त्याला असं काही जखडलं की, कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित जमीन गेली, राहतं घर गेलं.

डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि मनात निराशेचा अंधार… या अंधारातच त्याने एक धक्कादायक पाऊल उचलले. आपल्या पत्नी, तेजस्विनी आणि दोन वर्षांच्या निष्पाप मुलाला विष देऊन त्याने स्वतःही गळफास लावून घेतला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ज्या घरात कधीकाळी हसण्याचा आवाज घुमत होता, तिथे आता भयाण शांतता पसरली आहे. लक्ष्मणच्या आत्महत्येने केवळ एक कुटुंब संपले नाही, तर ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा क्रूर चेहरा उघड झाला आहे.

दुसरा बळी, फसवणुकीचा…

लक्ष्मणच्या चितेची आग विझते न विझते तोच, याच डिजिटल फसवणुकीचा दुसरा बळी समोर आला. कारी गावचा वैभव डोके. याने आयुष्य गमावलं नाही, पण आयुष्याची कमाई नक्कीच गमावली. रमीच्या याच मायाजालात त्याची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाली.

‘सिस्टम’च अशा पद्धतीने बनवली आहे की तुम्ही जिंकूच शकत नाही, असा आरोप करत वैभवने आता सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. माझे गेलेले पैसे परत मिळावेत आणि या फसव्या ॲप्सवर कारवाई व्हावी, अशी मागणी तो करत आहे. त्याचे पैसे परत मिळतील का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण या घटनेने ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली चालणारा गोरखधंदा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.

धोक्याची घंटा

ही केवळ दोन तरुणांची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे ग्रामीण भागातल्या त्या प्रत्येक तरुणाची, जो झटपट पैशाच्या मृगजळामागे धावतोय. शेती आणि कष्टाला पर्याय म्हणून पाहिलेला हा ‘शॉर्टकट’ आता आयुष्यालाच ‘कट’ मारत आहे. धाराशिवमधील या दोन घटना म्हणजे केवळ एक धोक्याची घंटा आहे. वेळीच सावध न झाल्यास, हा डिजिटल राक्षस अजून किती जणांचे संसार उद्ध्वस्त करेल, हे सांगता येत नाही.


“ऑनलाईन रमी”चा विळखा – समाज, सरकार आणि आपण सारेच दोषी!

एका बाजूला ९३ वर्षांचे आजोबा आपल्या पत्नीसाठी दागिना घेण्यासाठी सोनाराकडे जातात, आणि त्यांच्या प्रेमळ कृतीमुळे संपूर्ण समाज हेलावून जातो. दुसऱ्या बाजूला आपल्या तरुण पिढीला ‘ऑनलाईन रमी’सारखे गेम अक्षरशः गिळंकृत करत आहेत. ही शोकांतिका आणि वास्तव समाजाच्या विवेकाला हादरवणारी आहे.

ऑनलाईन गेम्समुळे देशभरातील अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. मुलांनी ऑनलाईन रमी खेळून घरातील पैसे उधळल्याच्या शेकडो घटना आजवर समोर आल्या आहेत. काही ठिकाणी आत्महत्येच्या घटनाही घडल्या आहेत.

या सगळ्यात सरकारची भूमिका आश्चर्यकारक आहे – “बंदी आणावी का, नाही का?” या संभ्रमात वर्ष जातात, पण ‘कमाई’ करणाऱ्या अ‍ॅप्सना थोपवण्याची जबाबदारी कोणीही उचलत नाही. शिक्षणव्यवस्था कोलमडली आहे, रोजगार नाही, आणि झटपट श्रीमंतीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांचा ऑनलाईन रमीसारख्या खेळांकडे कल वाढतोच आहे.

हे थांबवायचं असेल, तर केवळ सरकारकडे पाहून चालणार नाही. समाज म्हणून, पालक म्हणून, आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यालाही आवाज उठवावा लागेल. कारण उद्या बातमीत ‘तो’ मुलगा दुसऱ्याच्या घरचा नसेल, आपल्या घरचाच निघेल!

  • अभियंता प्रसाद पाटील – पुणे

 

Previous Post

धाराशिव: अभिनव स्कूल प्रकरण तापले; मनसेची शाळा मान्यता रद्द करण्याची मागणी

Next Post

९३ वर्षांचं प्रेम, सुरकुतलेल्या गालावरची खळी आणि सोनाराची माणुसकी: माधुकरी मागणाऱ्या जोडप्याची गोष्ट, जिने महाराष्ट्र रडवला!

Next Post
९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

९३ वर्षांचं प्रेम, सुरकुतलेल्या गालावरची खळी आणि सोनाराची माणुसकी: माधुकरी मागणाऱ्या जोडप्याची गोष्ट, जिने महाराष्ट्र रडवला!

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group