धाराशिव : मित्राला पंढरपूरला घेवून जाण्याचा बहाणा करून वाटेत त्याच्या डोक्यात लाकडाने मारून खून केल्याप्रकरणी बसवंतवाडी ता.तुळजापूर येथील एकजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-1) रमेश पांडुरंग भोसले, रा. बसवंतवाडी ता.तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 19.04.2024 रोजी 08.00 ते 21.00 वा. सु. साठवण तलाव शेकापुर शिवार धाराशिव येथे मयत नामे- राजेंद्र शामराव बोबडे, वय 35 वर्षे, रा. बसवंतवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने पंढरपुर येथे घेवून जाण्याचे बाहण्याने घेवून जावून त्यांचेकडील 18,000₹ कढून घेवून त्यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लाकडाने डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन त्यास अज्ञात स्थळी सोडून त्यात यातील मयत यांचा औषधोपचारा दरम्यान दि.05.05.2024 रोजी 05.00 वा. सु. मृत्यु झाला आहे. अपघाती मृत्युच्या चौकशी वरुन फिर्यादी नामे- समाधान प्रभाकर शिंदे, वय 21 वर्षे, रा.बसवंतवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 307, 302 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
लोहारा : मयत नामे-अजिम आल्लाबक्ष सुंबेकर, वय 35 रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.22.04.2024 रोजी 21.30 ते दि. 23.04.2023 रोजी 04.00 वा. सु. पुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजीपणे चालवून अजिम सुंबेकर यांना धडक दिली. या अपघातात अजिम सुंबेकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अज्ञात वाहन चालक जखमीस उपचार कामी न नेता व अपघाताची माहिती ने देता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे वडील फिर्यादी नामे- अल्लाबक्ष यासीन सुंबेकर, वय 65 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.16.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279,304(अ), सह 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.