धाराशिव – तालुक्यातील पोहने येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोहनेरच्या ग्रामसचिव- आयोध्या शंकर शिंदे, वय 47 वर्षे, रा. तडवळा ता. जि. धाराशिव ह.मु.हनुमान चौक बार्शी नाका, धाराशिव या दि.24.11.2023 रोजी 18.30 ते 19.00 वा. सु. पोहनेर येथे मुक्कामी गेलेले ‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ या शासन सुचित कार्यक्रमाची एल.ई.डी. व्हॅन क्र एमएच 13 आर 2369 ही सुशिलादेवी कॉम्पलेक्स पोहनेर येथे उभी असताना सदर व्हॅन वरील डिजीटल जाहीरातीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले पोस्टर अज्ञात व्यक्तीने फाडून शासनाचे नुकसान करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरुन आयोध्या शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 427 अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
धाराशिव :आरोपी नामे-1) सुग्रीव दासु काळे, 2) प्रमोद बाबु काळे, 3) विलास अरुण हांडे, 4) संगिता विलास हांडे सर्व रा. भानसगाव ता.जि. धाराशिव यांनी दि. 25.11.2023 रोजी 17.30 वा. सु. भानसगाव येथे विठ्ठल रुक्मीणीचे मंदीराचे समोर फिर्यादी नामे- सागर विष्णु काळे, वय 29 वर्षे, रा. भानसगाव ता. जि. धाराशिव यांना तळ्यातील मोटारी शासकीय लोकांना का दाखविल्या या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, दगडाने व लोखंडी साखळीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सागर काळे यांनी दि.26.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.