• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सतरा गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात ‘कुक्या’ अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

admin by admin
June 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
सतरा गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात ‘कुक्या’ अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : दरोडा, जबरी चोरी आणि वाहनचोरी अशा एकूण १७ गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला कुख्यात आरोपी मोतीराम उर्फ कुक्या बादल शिंदे याला जेरबंद करण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुक्याला वरुडा पुलाजवळ सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक २५ जून रोजी जिल्ह्यात गस्त घालत असताना, त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. माहितीनुसार, दरोड्यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला कुख्यात आरोपी कुक्या शिंदे (रा. मोहा, ता. कळंब) हा काही कामानिमित्त धाराशिव शहराच्या दिशेने येत होता.

या माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ वरुडा पुलाजवळ सापळा रचला आणि कुक्या येताच त्याला मोठ्या कौशल्याने ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्याच्यावर धाराशिव, लातूर, बीड आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये ५ दरोडे, १ जबरी चोरी, १ दरोड्याचा प्रयत्न आणि १० मोटरसायकल व डिझेल चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

आरोपी कुक्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार यांच्यासह शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, नितीन भोसले आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

गजानन माऊली धाराशिव नगरी, भक्तीचा सागर लोटला घरोघरी!

Next Post

उमरग्यात शासकीय कामात अडथळा; महिला तलाठ्याला धमकी देत महिलेने स्वतःला केले जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरग्यात शासकीय कामात अडथळा; महिला तलाठ्याला धमकी देत महिलेने स्वतःला केले जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : एकाच आयडीबीआय (IDBI) बँक खात्यातून तब्बल १०.६५ कोटींचा सायबर दरोडा

July 19, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब तालुक्यात धक्कादायक! साडेसोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!